शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग सप्ताहाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 20:59 IST

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध क्षयरोग केंद्रात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. क्षयरोग दिनानिमित्त गांधी मेमोरिअल लेफ्रसी फाउंडेशन येथून प्रभात काढण्यात आली.

ठळक मुद्देविविध कार्यक्रम : उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार

आॅनलाईन लोकमतवर्धा : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध क्षयरोग केंद्रात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. क्षयरोग दिनानिमित्त गांधी मेमोरिअल लेफ्रसी फाउंडेशन येथून प्रभात काढण्यात आली. या फेरीम क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. या प्रभात फेरीचा समारोप जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात झाला. याच मैदानात गत आठ दिवसात झालेल्या कार्यमांचा समारोपही करण्यात आला.२४ मार्च १८८२ रोजी डॉ. रॉर्बट कॉक यांनी क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावल्यामुळे क्षयरोगाचा उपचार करणे शक्य झाले. यामुळे जगभरात २४ मार्च ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व डीएमसीमध्ये क्षयरोग दिनाचा कार्यक्रम झाला.सकाळी ८ वाजता गांधी मेमोरिअल लेफ्रसी फाउंडेशन येथून प्रभात फेरी प्रारंभ करून क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. या प्रभात फेरीचा समारोप जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात झाला. याच वेळी कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. आरोग्य सभापती जयश्री गफाट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, अतिरिकत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. पारेकर, डॉ. रेवतकर, डॉ. सचिन पावडे, डॉ. प्रविण धाकटे, डॉ. शंतनु चव्हाण, डॉ. राजेश सरोदे, डॉ. स्वाती पाटील उपस्थित होते.याप्रसंगी उत्कृष्ठ डॉट प्रोव्हायडर, उत्कृष्ठ खासगी वैद्यकीय व्यावसायिक व खासगी औषधी विक्रेते प्रफुल ठाकरे, श्रीधर जाजुदिया, विनय मोरे, विशाल पोखरे, विनोद मोनानी, राज बाराई उपस्थित होते. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व पोस्टर्स स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना स्मृतीचिन्ह, प्रशस्ती पत्र व रोख देत गौरविण्यात आले.याप्रसंगी डॉ. पुरुषोत्तम मडावी म्हणाले, या वर्षीच्या घोषवाक्यानुसार सर्वांनी पुढाकार घेत सन २०२५ पर्यंत क्षयमुक्त भारत करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. सन २०१८-१९ या वर्षात क्षयरुग्णांना दरमहा मिळणाºया ५०० रुपये मानधनाकरिता आरोग्य विभागातील सर्वांनी क्षयरुग्णांना औषधी नियमित व वेळेवर घेण्याकरिता सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली.प्रास्ताविक डॉ. स्वाती पाटील यांनी केले. संचालन सुमंत ढोबळे यांनी केले तर आभार जितेंद्र बाखडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता अक्षया प्रोजेक्टचे चंद्रशेखर व त्यांचे सहकारी व सुराक्षनिका अंतर्गत सर्व कर्मचारी सोनटक्के, पुनवटकर, शेळके, सारडे, जगताप व जिल्हा सामान्य नर्सिंग स्कूल वर्धा येथील प्रशिक्षणार्थ्यांनी सहकार्य केले. तसेच जिल्हा क्षयरोग केंद्र वर्धा येथील अधिकारी डॉ. मानकर व कर्मचारी रामटेके, पराड, दांडेकर, वासनिक, वैरागडे, श्रीराम राठोड, दाभाडे, मुन्ना अखतर, अनिल, किशोर आदींनी सहकार्य केले. यावेळी शहरातील विविध नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.