शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

थाळी वाजवून नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:15 IST

वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीच्या नेतृत्त्वात कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारांचे साखळी उपोषण : थकीत देयके अदा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीच्या नेतृत्त्वात कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. सदर आंदोलन मागील ११ दिवसांपासून सुरू असताना संबंधितांकडून मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत बुधवारी आंदोलनाच्या बाराव्या दिवशी आंदोलनकर्त्या ठेकेदारांनी थाळी बाजवून सुस्त प्रशासनाच्या दुर्लक्षी धोरणांचा निषेध नोंदविला.विविध योजनेंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांचे थकीत असलेले ३५.४० कोटी तात्काळ अदा करण्यात यावे. क्रेशर सॅँड लहान कंत्राटदारांना वापरण्यास मनाई असून फक्त मोठ्या कामासाठी त्याची परवानगी देण्यात यावी. जिल्ह्यातील रेतीघाट सुरू नसल्याने कंत्राटदाराची कामे थप्प आहेत. रेतीघाटाचे लिलाव लवकरात लवकर करण्यात यावे. डांबरीकरणच्या एस.एस. आर. रेट मध्ये फार तफावत आहे असून ५० लाखपर्यंत कामाच्या रॉयल्टी पासेस आॅफीसमध्ये जमा करण्यात याव्यात. आदिवासी व महसूल विभागाच्या कामाची अनामत रक्कम जमा झाल्या शिवाय निविदा काढू नये. १ कोटीपर्यंत कामावर अटी व शर्ती टाकू नये. लहान कामाचे क्लम्बींग करण्यात येवू नये. कररानाम्याच्या अनुसार कंत्राटदारांना मासीक देयके देण्यात यावे. इन्शुरन्सचे कार्यालय नागपूरमध्ये देण्यात यावे. मुदतवाढ पर्यंत विम्याचे कवच देण्यात यावे. कंत्राटदाराची कामे पूर्ण होवूनही ३ वर्षापासून अंतिम देयके दिली नाही ती देण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत काम करणाऱ्या कंत्राटदाराला रेतीघाट देण्यात यावे, या मागण्यांकडे बुधवारी थाळी वाजवून आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने लक्ष वेधले. सदर आंदोलनात कंत्राटदार कल्याण समितीचे अध्यक्ष किशोर मिटकरी, एस. बी. सिंग, राजू वानखेडे, नंदकिशोर थोरात, शैलेंद्र झाडे, विशाल व्यास, रवी ऐकापूरे, विजय लांबाडे, हेमंत नरहरशेट्टीवार, अमोल क्षीरसागर, अनिल पशीने, नागेश सरदार, संदीप चौरसीया, बाबा जाकीर, पारस माळोेदे, अवधुत मोने, मुकुंदा झामरे, शकील खान, विनोद भाटीया, संजय हिंगणघाटकर, सचिन बुटे, राजेश पोहरे, शारिक अली यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटदार सहभागी झाले होते.तोडगा न काढल्यास कुलूप बंद आंदोलन१ डिसेंबरपासून सा.बां.विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदारांनी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. बुधवारी आंदोलनाच्या १२ व्या दिवशी मागण्यांवर तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सुरू होते. वेळीच मागण्यांवर संबंधितांनी तोडगा न काढल्यास अधिकाºयांना कार्यालयात कोंडून कुलूप बंद आंदोलन करण्याचा इशारा किशोर मिटकरी यांनी दिला आहे.