शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

ट्रक-ट्रॅव्हल्सची धडक; २२ प्रवासी जखमी

By admin | Updated: June 8, 2017 02:27 IST

वर्धा ते वायगाव (नि.) मार्गावर नवोदय विद्यालयाजवळ ट्रॅव्हल्स व ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली.

सेलूकाटे जवळील अपघात : तिघांची प्रकृती चिंताजनक, सामान्य रुग्णालयात उपचार सुरू लोकमत न्यूज नेटवर्क वायगाव (नि.) : वर्धा ते वायगाव (नि.) मार्गावर नवोदय विद्यालयाजवळ ट्रॅव्हल्स व ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात चालकांसह २२ प्रवासी जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. हा अपघात ११.३० वाजताच्या सुमारास घडला. लिलाबाई चंद्रभान येल्ले (६५), कमलबाई बापुराव राऊत (६५), वामन पंजाबराव ताडाम (४०), गणेश नरेंद्र बनकर (५६), कौशल्या लक्ष्मण जुमनाके (४०) सर्व रा. हिंगणघाट, अजय उत्तम कुमरे (१८), सुभाष गणपत कोडापे (३१), मधुकर गुलाब परतेकी (३५) रा. रोठा, आदित्य जगदीश दिवे (१३), आशा जगदीश दिवे (३५) रा. वडनेर, बाबाराव तुळशीराम कुभारे (५२) सिंदी (मेघे) वर्धा, विनीत पुरूषोत्तम पवार (४२), दीपक रामदास पवार (५१) रा. सोनेगाव (स्टे.), अजय पंजाब कुमरे (१८) रा. मजरा (चाका) अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. आठ किरकोळ जखमी उपचार घेऊन परस्पर निघून गेल्याने नावे कळू शकली नाही. लखनसिंग ठाकूर यांच्या मालकीचा एमएच २७ एक्स ५६३४ क्रमांकाचा ट्रक विटा भरून वर्धा येथून राळेगावला जात होता. दरम्यान, हिंगणघाट येथून वर्धेकडे जाणाऱ्या एमएच ३२ बी ६६९६ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने ट्रकला जबर धडक दिली. यात ट्रॅव्हल्सचा समोरचा भाग चक्नाचूर झाला तर ट्रक पलटी झाला. अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह २२ जण जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची देवळी पोलिसांनी नोंद घेतली. अधिकाऱ्यांना माणुसकीचा विसर नवोदय विद्यालयजवळील भीषण अपघातात २२ जण जखमी झाले. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहन मिळत नव्हते. १०८ या क्रमांकावर फोन लागत नव्हता. दोन आॅटो चालकांनी आपले प्रवासी उतरवून जखमींना वर्धा रुग्णालयात नेले. खासगी वाहन चालक जखमींना बसू देत नव्हते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट तपासणीस पथकाचे वाहन आले. यात दोन अधिकारी व एक चालक होते. त्यांना दोन रुग्णांना त्वरित वर्धा रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केली; पण त्यांनी साफ नकार देत परिवहन मंडळाला माणुसकीचा विसर पडल्याचा परिचय दिला.