शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तारकुंपणामुळे शेतकऱ्यांची वहिवाट अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:21 IST

सी.ए.डी. कॅम्प पुलगावच्यावतीने पडीक जमिनीवर तारकुंपण केल्यामुळे जामनी येथील शेतकऱ्यांचा वहिवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेताकडे जाण्यासाठी रस्ताच राहिला नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या प्रकरणी संबंधितांनी योग्य कार्यवाही करावी, .....

ठळक मुद्देवरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी : शेतकऱ्यांना नाहक त्रास

ऑनलाईन लोकमतचिकणी(जामणी) : सी.ए.डी. कॅम्प पुलगावच्यावतीने पडीक जमिनीवर तारकुंपण केल्यामुळे जामनी येथील शेतकऱ्यांचा वहिवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेताकडे जाण्यासाठी रस्ताच राहिला नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या प्रकरणी संबंधितांनी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.गत कित्येक वर्षापासून जामणी चिकणी परिसरातील शेतकरी वहीवाटी करीता सी. ए. डी. कॅम्पच्या जागेतुनच ये-जा करत होते. बैलबंडी तथा वाहने याच रस्त्याने ने-आण केल्या जायची. या मार्गावर परिसरातील सुमारे २५ शेतकऱ्यांच्या शेतजमीनी आहेत. परंतु, तारांचे कुंपन टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांनी शेतात जावे कसे असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. यंदाच्या हंगामातील विविध पीक सध्या अंतिम टप्प्यात आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातच कापूस व तूर पडून आले. शिवाय सध्या चणा पिकाच्या मळणीच्या कामांना वेग दिल्या जात आहे. परंतु, रस्ताच बंद झाल्याने शेतातील पीक घरी कसे आणावे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देवळीच्या तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मात्र, त्यावर अद्यापही कुठलीही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांची समस्या कायम आहे. स्थानिक महसूल प्रशासन व सी.ए.डी.कॅम्प पुलगाव यांची या प्रकरणात सामज्यस्यांने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. शिवाय वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.