शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बस, इनोव्हा व ट्रकचा तिहेरी अपघात

By admin | Updated: March 13, 2015 02:04 IST

येथील यशवंत चौकात तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात इनोव्हा गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

सेलू : येथील यशवंत चौकात तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात इनोव्हा गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ आगाराची बस क्रमांक एमएच ४० वाय ५७४१ नागपूर-वर्धा-यवतमाळ ही स्थानिक यशवंत चौकात प्रवासी उतरविण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभी करण्यात आली. यामुळे तिच्या मागे येत असलेली इनोव्हा कार क्र. एमएच ३१ सीएस ९२०० ही बस जाण्याची वाट पहात थांबली. अशातच मागावून आलेला ट्रक क्र. एमएच ०४ जीएफ ८९८८ याने इनोव्हाला मागाहून जबर धडक दिली. त्यामुळे इनोव्हा कार उभ्या असलेल्या बसच्या मागील भागात जावून फसली. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही; परंतु अपघात मात्र एवढा विचित्र झाला की बघणाऱ्यांची गर्दी जमा झाली.अपघात स्थळापासून पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा पोलिसांना अपघात स्थळी पोहचण्यास एक तास लागला. सदर ठिकाणी वाहनांची नेहमीच गर्दी राहत असल्या कारणाने बसेस कुठेही उभ्या केल्या जातात. त्यामुळे वारंवार अपघात घडत असतात. स्थानिक चौकात दोन्ही बाजूंनी गतिरोधक लावावे, अशी मागणी वारंवार नागरिकांनी केली. (तालुका प्रतिनिधी)