शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजबांधव रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:33 IST

पोलिसांनी आत्महत्या दर्शविलेल्या शुभांगी पिलाजी उईकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांनी केला आहे.

ठळक मुद्देशुभांगी उईके हत्या प्रकरण : पोलीस तपासाचा नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलिसांनी आत्महत्या दर्शविलेल्या शुभांगी पिलाजी उईकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांनी केला आहे. या प्रकरणात असलेल्या आरोपींना शिक्षा मिळावी व प्रकरणाला आत्महत्येचे वळण देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करावे या मागणीकरिता मंगळवारी मूलनिवासी आदिवासी समाजबांधव रस्त्यावर उतरला. या मोर्चात सहभागी समाजबांधवांनी पोलीस प्रशासनाचा चांगलाच निषेध नोंदविला.गोंडवाना मूलवंशी संघटनेच्यावतीने पुकारलेल्या या मोर्चात विदर्भातील जिल्ह्यातून समाजबांधव सहभागी झाले होते. आर्वी मार्गावरील कारला चौक परिसरातील शनीमंदिर परिसरात असलेल्या मैदानावरून निघालेला हा मोर्चा मुख्य मार्गाने बजाज चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाकचेरीवर धडकला. या मोर्चाला डॉ. आंबेडकर चौकात रोखण्यात आले. येथून एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात शुभांगीची आत्महत्या नाही तर तिचा बलात्कार करून हत्या करण्यात आली असून या दिशेने तपास करण्याची मागणी करण्यात आली. शिवाय पोलिसांनी या प्रकरणात पुरावे नष्ट करून आत्महत्येचा देखावा निर्माण केला आहे. दहेगाव (गो.) पोलीस ठाण्यात असलेल्या काही कर्मचाऱ्यांकडून सदर प्रकरण हाताळताना मोठी हयगय केल्याचा आरोपही करण्यात आला.पोलिसांकडून सदर प्रकरण दडपण्याचा आरोपही या मोर्चात सहभागी समाजबांधवांकडून करण्यात आला. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पोहोचला असता मोर्चाचे रूपांतर एका सभेत झाले. यावेळी मोर्चात सहभागी काही ज्येष्ठ सदस्यांनी या प्रकरणात मृतक शुभांगीला जर न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.आज निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व अवचितराव सयाम, चंद्रशेखर मडावी, निलेश पेंदाम, सचिन नरते, शंकर उईके, राहुल गेडाम यांनी केले.आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पोलिसांना निलंबित करामैत्रिणीच्या साक्षगंधाला गेलेली शुभांगी परत आली नसल्याने तिचे आई-वडील पोलिसांकडे तक्रार करण्याकरिता गेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना परत पाठविले. यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा विवस्त्र मृतदेह आढळून आला. तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले; पण परिस्थितजन्य पुराव्यांवरून तिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप शुभांगीच्या आई-वडिलांसह अनेक आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हत्या झाल्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत; पण पोलिसच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे हत्येच्या प्रकरणात आत्महत्येचा बनाव निर्माण करणाºया पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.युवकांकडून रस्ता रोकोचा प्रयत्नशनी मंदिर परिसरातून निघालेला हा मोर्चा आर्वी नाका परिसरात पोहोचला असता मोर्चात सहभागी युवकांकडून रस्ता रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी वेळीच सतर्कता बाळगल्याने तो प्रयत्न फसला. यानंतर मोर्चा ठाकरे मार्केट परिसरात पोहोचला असता येथेही रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र मोर्चात सहभागी ज्येष्ठांनी नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही, असे म्हणताच युवकांनी सदर प्रकार टाळला.मोर्चात युवकांचा अधिक समावेशशुभांगीच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून तपासात होत असलेल्या हयगयीच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून पोलिसांच्या कार्यवाहीचा चांगलाच निषेध नोंदविण्यात आला. पोलिसांकडून जर या प्रकरणात दोषी असलेल्यांना अटक करण्यात आली नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

टॅग्स :Murderखून