शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या काळात आदिवासींनी विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:03 IST

भाजपाची अठरा राज्यासह देशावर सत्ता आहे. त्यामुळे आदिवासींना आपल्या समस्या सोडविण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज नाही. भाजप सरकारच्या काळात आदिवासींनी आपला विकास करून घेतला पाहिजे, ....

ठळक मुद्देहंसराज अहीर : आदिवासी आघाडीच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भाजपाची अठरा राज्यासह देशावर सत्ता आहे. त्यामुळे आदिवासींना आपल्या समस्या सोडविण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज नाही. भाजप सरकारच्या काळात आदिवासींनी आपला विकास करून घेतला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.येथे आयोजित भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, महाराष्टÑ प्रदेश आदिवासी मोर्चा आघाडीचे प्रा. हरिशचंद्र भोये, भाजपच्या आदिवासी विकास आघाडीचे राष्टÑीय उपाध्यक्ष खा. अशोक नेते, महाराष्टÑ प्रभारी अमसिंग तिलावत, लक्ष्मीकांत घानगावे, खा. रामदास तडस, उध्दव येरमे, कृष्णराव चव्हाण, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. पास्कल धनारे, आ. डॉ. देवराव होळी, आ. राजु तोडसाम, श्याम धुर्वे, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी आदींची उपस्थिती होती.अमरसिंग तिलावत यांनी महाराष्टÑात २६ आदिवासी लोकसंख्या बहुल असलेले जिल्हे आहेत. या जिल्ह्यात आदिवासींच्या अनेक अडचणी आहेत. सरकार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या प्रश्नांवर लक्ष घालून त्यांच्या समस्या सोडवाव्यात. वेळप्रसंगी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दरबारीही याबाबत बैठक घ्यावी, अशा सुचना दिल्या.जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी खा. रामदास तडस यांनी केले. राज्यध्यक्ष हरिशचंद्र भोये यांनी महाराष्टÑात १४ जिल्हे व ५० विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे याच भागावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे सांगितले. राज्यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे येथे पुढील काळात आदिवासी आघाडीच्या प्रदेश बैठका घेवून मुंबई येथील बैठकीत आदिवासी आश्रम शाळांची समस्या, पेसा कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचण, आदिवासी लोकप्रतिनिधींना निधी मिळण्यात होत असलेली दिरंगाई आदीबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावावी बाबतही चर्चा यावेळी करण्यात आली.बैठकीला महाराष्टÑातील २६ पैकी आदिवासी आघाडीचे १४ जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. राज्यातील आदिवासी आघाडीच्या संघटन बांधनीची माहिती या बैठकीत घेण्यात आली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव तथा भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.