शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

झाडे लावली; पण संरक्षक कठडे बेपत्ताच

By admin | Updated: July 5, 2017 00:24 IST

स्थानिक बसस्थानक परिसरात महामार्गालगतच्या दोन्ही सर्व्हीस रोडवर लहान-मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते.

अतिक्रमण हटल्याने दिलासा : तारांचे कुंपण न केल्याने पुन्हा लागणार दुकानेलोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : स्थानिक बसस्थानक परिसरात महामार्गालगतच्या दोन्ही सर्व्हीस रोडवर लहान-मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. ओरिएंटल पाथवे कंपनीने मागणी लक्षात घेत अतिक्रमण हटविले, तेथे वृक्षारोपण केले; पण संरक्षक कठडे तथा तारांचे कुंपण केले नाही. यामुळे अतिक्रमण जैसे थे होण्याची भीती व्यक्त होत आहे. सर्व्हीस रोडवर अतिक्रमण झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. ग्रामस्थांच्या मागणीवरून तथा नगर पंचायतच्या पुढाकाराने १५ दिवसांपूर्वी अतिक्रमण हटविण्यात आले. रस्त्यालगत फुल झाडे व शोभेची झाडे लावण्यात आली; पण झाडांच्या सुरक्षिततेसाइी तारांचे कुंपण वा संरक्षक कठड्यांची व्यवस्था केली नाही. यामुळे झाडांचे भवितव्य धोक्यात आले आहे. हजारो रुपये खर्चून लावलेली झाडे मोकाट जनावरे फस्त करीत असल्याचे दिसून येते. अतिक्रमण हटविलेल्या जागेवरही तारांचे कुंपण करण्यात आले नाही. यामुळे पुन्हा अतिक्रमण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पूर्वीप्रमाणेच अतिक्रमण झाल्यास शहरातील वाहतूक धोक्यात येऊन अपघाताला निमंत्रण ठरणार आहे. यापूर्वीचे अतिक्रमण ओरीएंटल पाथवे कंपनीच्या दुर्लक्षामुळे झाले होते, असा आरोप होत आहे. आता पुन्हा दुर्लक्ष केल्यास अतिक्रमण हमखास होणार, हे निश्चित आहे. यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. ओरिएंटल कंपनीकडून नागरिकांच्या अपेक्षासर्व्हीस रोडवर वारंवार अतिक्रमण होऊ नये म्हणून ओरीएंटल पाथवे कंपनीने प्रत्येक १५ दिवसांनी भेट द्यावी. अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. मोकाट गुरे पकडून कारवाई करावी. त्वरीत तारांचे कुंपण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहे. महामार्गावर अतिक्रमण होऊ न देण्याची व देखभाल करण्याची जबाबदारी ओरिएंटल पाथवे कंपनीची आहे. यामुळे ही जबाबदारी निरपेक्षपणे पार पाडावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात.