शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वृक्ष संवर्धन मानवासाठी अत्यावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:14 IST

स्थानिक ग्रामपंचायत भवनातून वृक्षदिंडीला खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अनिल सोले यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देअनिल सोले : आंजी (मोठी) येथे वृक्षदिंडीचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कआंजी (मोठी) : स्थानिक ग्रामपंचायत भवनातून वृक्षदिंडीला खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अनिल सोले यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प शासनाने जाहीर केला आहे.या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हावे याकरिता ग्रीन अर्थ आॅर्गनाझेशन संस्था, जि.प.च्या शिक्षण सभापती जयश्री गफाट, व सरपंच जगदीश संचेरिया यांच्या पुढाकाराने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले.यावेळी शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. तर उद्घाटक म्हणून आमदार तथा ग्रीन अर्थ आॅर्गनाझेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.उपाध्यक्षा कांचन नांदुरकर, शिक्षण सभापती जयश्री गफाट, कृषी सभापती मुकेश भिसे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सरपंच जगदीश संचेरिया, पं.स.सभापती महानंदा ताकसांडे, पं.स.सदस्य राजू डोळसकर, वंदना बावणे, जिल्हा नियोजन समितीचे सुनिल गफाट, वनविभागाचे बडेकर, मिलिंद भेंडे, जिल्हा संयोजक कामडी, इंद्रजीत बत्रा, दीपक बत्रा, व ग्रा.प. सदस्य उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन झाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सरपंच जगदीश संचेरिया यांनी गावातील वृक्ष लागवडीचे लक्ष्य व साध्य स्पष्ट करून गाव वृक्षारोपन व संवर्धनात अग्रेसर असल्याचे सांगितले. गावातील नरसाई गडावर निर्माण होणाऱ्या आॅक्सीजन पार्कची माहिती दिली.सभापती जयश्री गफाट यांनी वृक्षदिंडीचे महत्व विषद केले. तर ग्रीन अर्थ आॅर्गनाझेशनचे प्रमुख तथा आमदार अनिल सोले यांनी वृक्ष लागवड संवर्धन आपल्यासाठी खूप अत्यावश्यक आहे. कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत वृक्ष आपणास उपयोगी आहे. ते जगवून धरणी मातेचे ऋण फेडायचे आहे. असे प्रतिपादन केले.तर अध्यक्षीय भाषणात खासदार तडस यांनी वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व विषद केले. यावेळी वृक्षारोपण व संगोपन करणाºया व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये मुस्लीम कब्रस्थानमध्ये ३०० वृक्षांची लागवड करून संगोपन करणारे स्वातंत्र्य संग्राम सैनिक शेख रज्जाक मियॉ, अल्पसंख्याक विकास संस्थाचे संस्थापक मतिन शेख व मानवता बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष रफीक शेख यांचाही सत्कार करण्यात आला.नॅशनल अ‍ॅडवेंजरद्वारा वृक्षारोपण व संवर्धन करणाºया भारती गोमासे, गर्ल्स हायस्कूलच्या हरित सेनेच्या संयोजिका मेहरे, सोशल मिडीयाद्वारे इवलस रोपट या कवितेतून जागरूकता करणारी रिता तपासे, हनुमान मंदिर देवस्थान परिसरात वृक्षारोपण करून जगविणारे समिती प्रमुख नरेश पचारे, संत अवधुतनाथ मठ परिसरात वृक्षारोपण करून संगोपन करणारे गजानन ताल्हन, आशिष वाटमोडे, किशोर ताल्हन, सत्यजीत काचेवार आदींचा सत्कार करण्यात आला.यानंतर ग्रीन अर्थ आॅर्गनाझेशनचे जिल्हा संयोजक प्रशांती कामडी यांनी सर्व उपस्थितांना वृक्षारोपण संवर्धनची शपथ दिली. वृक्षदिंडीला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. दिंडीत शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, वनविभागाचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते, नागरिक महिला उपस्थित होते. संचालन मोहीन शेख यांनी तर आभार उपसरपंच नितीन भावरकर यांनी मानले.नरसाई गडावर आॅक्सीजन पार्कस्थानिक निसर्गरम्य नरसाई गडावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या कल्पनेतून ग्रामपंचायत अंतर्गत रोहयोेतून वृक्षारोपण व संवर्धन करून आॅक्सीजन पार्क म्हणून विकसीत होणार आहे.यामध्ये २००० वृक्ष लावण्यात येणार असून यामध्ये वनऔषधी, फळझाडे यांचाही समावेश होणार आहे.पर्यटनस्थळ म्हणून विकसीत होत असून पिकनिक स्पॉटमध्ये विकसीत होईल.मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून आॅक्सीजन पार्कच्या कार्याला सुरूवात झाली. या पार्कच्या विकासासाठी जि.प.सभापती जयश्री गफाट, सरपंच जगदीश संचेरिया प्रयत्नरत आहे.