शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

योग्य आळ्यांमुळे कमी पाण्यात वृक्ष संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:03 IST

हनुमान टेकडीवर मागील दोन वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे राबविली जात आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय जनजागृती मंचचा उपक्रम : तंत्र शिकून अन्यत्रही वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन

ऑनलाईन लोकमतवर्धा : हनुमान टेकडीवर मागील दोन वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे राबविली जात आहे. राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाद्वारे आयोजित वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत हनुमान टेकडीवर नऊ हजार रोपटी लावण्यात आली आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसांत रोपट्यांचे संवर्धन महत्त्वाचे ठरणार आहे. या संवर्धनाकरिता वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे तांत्रिकदृष्ट्या योग्य आळे केले आहे. या आळ्यांमुळे कमी पाण्यातही झाडे जगू शकत असल्याचे सांगण्यात आले आहे.विविध सामाजिक संघटना, वाढदिवस आणि अनेकांच्या स्मृती -प्रीत्यर्थ हनुमान टेकडीवर येत वृक्षारोपण केले. सर्वांनी लावलेल्या रोपट्यांचे वृक्षात परिवर्तन करण्याचा वसा वैद्यकीय जनजागृती मंचने घेतला आहे. झाडांच्या संरक्षणाकरिता त्यांना आधार देण्यासह आसपास वाढलेले गवत कापण्याचे कामही त्यांच्यावतीने टेकडी परिसरात झाले. या टेकडीवरील वृक्षारोपणाची दखल घेत येथे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक अधिकाºयांनी भेट दिली. वृक्षसंवर्धन कार्याला जिल्हाधिकाºयांनी अनेकदा सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनात येथे झाडांकरिता पाण्याची सुविधा करण्यात आली असून यातून सध्या वृक्षसंवर्धनाचे काम सुरू आहे.टेकडीवर लावलेल्या वृक्षांपैकी सुमारे ९५ टक्के वृक्षांचे संवर्धन झाले आहे. वृक्षांना नियमित पाणी दिले जाते. प्रत्येक वृक्षांभोवती तांत्रिक दृष्ट्या योग्य आळे तयार केले आहे. यामुळे कमी पाण्यातही वृक्षाला आवश्यक पाणी टिकवून ठेवण्यास साह्य होते, अशी माहिती व्हीजेएमचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी दिली. या वृक्षांच्या संगोपन कार्यात सहकार्य करावे आणि आळे तयार करण्याचे तंत्रदेखील जाणून घ्यावे. त्यामुळे अन्य ठिकाणीदेखील वृक्ष संवर्धनास उपयोग होईल, असे आवाहनही वर्धेकरांना व्हीजेएमद्वारे करण्यात आले आहे.