शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

पोटाच्या खळगीसाठी राजस्थान ते वर्धा प्रवास

By admin | Updated: January 21, 2016 02:03 IST

संघर्ष जगण्याचा : दुकानांच्या गर्दीत कचेरी मार्गावरील उघड्यावरचा संसार दुर्लक्षित

वर्धा : स्वयंपाकघरासाठी लागत असलेल्या वस्तूंचे कुठल्याही स्त्री ला मोठेच कौतुक असते. त्यातच अशा अनेक गोष्टी शहरात फिरताना रस्त्यावर पाहायला मिळाल्यास त्यांना खरेदीचा मोह आवरत नाही. यामुळे सध्या शहरात राजस्थान येथून लोखंडी वस्तू विक्रीसाठी आणलेल्या नागरिकांची दुकाने ग्राहकांनी फुललेली दिसतात. उघड्यावरची दुकाने पाहताना त्यांचा उघड्यावरचा संसार मात्र अनेकांना लक्षात येत नाही. सध्या शहरातील कचेरी मार्गावर राजस्थान येथून आलेल्या काही कुटुंबांची लोखंडी साहित्याची दुकाने सजली आहेत. विविध आकाराचे तवे, विविध मापाच्या कढया, पावशी, सत्तूर, सांडशी, पायल्या, खलबत्ते, पायली, चाळण्या, झारे, घमेले यासह कुऱ्हाड व इतरही साहित्य विक्रीस आहेत. मोठ्या प्रमाणात व तुलनेत स्वस्त सदर साहित्य खरेदीसाठी खास महिलावर्गाची लगबग पाहावयास मिळते. हे साहित्य घेऊन अनेकांच्या घरी चमचमीत पदार्थ तयार होणार असले तरी ते विक्री करीत असलेल्यांना येथेच रस्त्याच्या कडेला चूल मांडून भाकरीचा तुकडा तोडावा लागत आहे. यातून किती पैसे घरी न्याल, असे एखाद्याला विचारले असता ‘खा-पी के सब बराबर हो जाता है साहब’, असेच उत्तर मिळते. संपूर्ण कुटुंब दिवसभर साहित्याची विकी करते. याच वेळी त्यांची कच्ची-बच्ची रस्त्यावर आपल्याच धुंदीत खेळत असतात. कधी एखादे वाहन त्यांच्या अंगावरून जाईल याची भ्रांतही त्यांना नसते. दिवस ओसरल्यावर एकीकडे चुलीवर अन्न शिजत असताना परिवाराचा मुखिया मिळालेल्या पैशाची आकडेमोड करीत असतो. कडाक्याच्या थंडीत उघडावरच नव्या दिवसाची वाट पाहत हे निद्राधीन होतात. साहित्य खरेदीसाठी आल्यावर नको असलेल्या वस्तूंकडे जसे दुर्लक्ष व्हावे, तसाच त्यांचा संसारही नागरिकांच्या नजरेतून दुर्लक्षितच राहतो.(शहर प्रतिनिधी)