शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त पैसे मोजून करावा लागताे खासगी वाहनातून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

भंगार वाहनांचा वापर सध्या खासगी प्रवासी वाहतुकीसाठी केला जात आहे. प्रत्येक प्रवाशाला चांगली खासगी प्रवासी वाहतूक सेवा मिळावी तसेच कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभाग प्रयत्न करीत असला तरी अनेक भंगार वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा करून त्यांची ने-आण केली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे अनेक नागरिकांना ये-जा करण्यासाठी खासगी प्रवासी वाहनांचा वापर करावा लागत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील वर्धा-आर्वी, वर्धा-कारंजा, वर्धा-हिंगणघाट, वर्धा-पुलगाव तसेच वर्धा-सेलू या मार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करण्यासाठी काही खिळखिळी वाहने सोडली जात आहेत. याच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना भरणा करून नागरिकांची ने-आण केली जात असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे. परिणामी, उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याची गरज आहे. जिल्ह्यात ४०९ टुरिस्ट कॅब आहेत. असे असले तरी दिवाळीच्या तोंडावर रापमच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू करताच काही खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी जिल्ह्याबाहेरून टॅक्सी परमिट वाहने वर्धा जिल्ह्यात आणली. यासह काही भंगार वाहनांचा वापर सध्या खासगी प्रवासी वाहतुकीसाठी केला जात आहे. प्रत्येक प्रवाशाला चांगली खासगी प्रवासी वाहतूक सेवा मिळावी तसेच कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभाग प्रयत्न करीत असला तरी अनेक भंगार वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा करून त्यांची ने-आण केली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करून नोंदणी झाली की नाही याची शहानिशा करण्याची गरज आहे.

दीडपट भाडे देऊनही जीवाला धोका-   खासगी प्रवासी वाहतूक करणारे सध्या मूळ प्रवास भाड्यापेक्षा दीडपट भाडे नागरिकांकडून आकारात आहे. हा मनमर्जी कारभार ग्रामीण भागात सर्वाधिक बघावयास मिळत असून वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.

कुठल्याही प्रवाशाची आर्थिक पिळवणूक होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. शिवाय प्रत्येक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पण कुणी नियमांना बगल देत असेल तर त्याबाबतची तक्रार नागरिकांनी थेट उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे करावी. वेळीच दोषींवर कारवाई करण्यात येईल.- मो. समीर याकूब शेख, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.

वर्धा-हिंगणघाट मार्गावर काही खासगी प्रवासी वाहने सोडली जात आहेत. पण या वाहनांमध्ये प्रवाशांना जनावरांसारखे कोंबून त्यांची ने-आण केली जात आहे. त्यामुळे मोठा धोका पत्कारून या वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे या वाहनांनी प्रवास करताना नरकयातनाच सहन कराव्या लागतात.- नरेंद्र चाफले, प्रवासी.

या वाहनांशिवाय पर्याय काय?

काम बंद आंदोलनामुळे रापमच्या बसेस बंद आहेत. त्यामुळे वर्धा-आर्वी तसेच वर्धा-कारंजा मार्गावर धावणाऱ्या काळ्या पिवळीचा आधार सध्या नागरिकांना आहे. पण या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा केल्या जात असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. - सुमीत अवथळे, प्रवासी. 

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप