शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

महामंडळाच्या बसमधूनही होते दारूची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:46 IST

खरांगणा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून काटोल-आजनसरा बसला नाकेबंदी करून झडती घेण्यात आली. बसमध्ये ४०० नग विदेशी दारूच्या शिशा आढळून आल्या.

ठळक मुद्देकाटोल-आजनसरा बसमधून दारू जप्त : पाच आरोपींना अटक, ४१ हजारांचा दारूसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : खरांगणा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून काटोल-आजनसरा बसला नाकेबंदी करून झडती घेण्यात आली. बसमध्ये ४०० नग विदेशी दारूच्या शिशा आढळून आल्या. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून चार आरोपी जबलपूरचे तर एक आरोपी वर्धेचा आहे.आरोपी प्रीती सुनील जाट (२०), चांदनी गुलजारी जाट (२६), आशिष शिवनारायण जाट (२६) व राजेंद्र रामकुमार जाट (२५) सर्व रा. कंजर मोहल्ला नर्मदा मंदिर मागे जबलपुर आणि राखी मधुकर कंजर जाट (४०) रा. कंजर मोहल्ला इतवारा वर्धा हे जबलपूर येथून दारूसाठा बॅगमध्ये भरून काटोलला रेल्वेने आले होते. यानंतर त्यांनी काटोल-आजनसरा, खरांगणा मार्गे जाणाºया बस क्र. एमएच ४० एन ९५४७ मध्ये दारूसाठ्यासह प्रवास सुरू केला. दरम्यान, जमादार गजानन बावणे यांना बसने दारू येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरून त्यांनी खरांगणा बस स्थानकाजवळ कठडे लावून नाकाबंदी केली. बसची झडती घेतली ४१ हजारांच्या दारसाठ्यासह पाच आरोपी मिळून आले. पाचही आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), ७७ (अ), ८३ अन्वये गुन्हा दाखल कण्यात आला. ही कारवाई जमादार गजानन बावणे, राजेश शेंडे, प्रज्ञा नाखले, प्रवीण गुडवार यांनी केली.कारसह ६.५० लाखांचा दारूसाठा जप्तवर्धा - चार चाकी वाहनातून दारू आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून कांढळी चौरस्ता येथे सापळा रचून कारसह ६ लाख ५० हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.गोंडप्लॉट येथील कमल शर्मा हा त्याच्या साथीदारासह वर्धा शहरात कार क्रमांक एमएच ३२ वाय २९८९ ने दारू आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून कांढळी चौरस्ता येथे सापळा रचण्यात आला. सदर कारची झडली घेतली असता विदेशी दारू आढळून आली. यात कारसह ६ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कमलकिशोर चंद्रीकाप्रसाद शर्मा (२६) रा. गोंडप्लॉट व धर्मा राजू लोंढे (२०) रा. अशोक नगर वर्धा विरूद्ध सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस व पोलीस उपअधीक्षक (गृह) सुभाष सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या उदससिंग बारवाल, परवेज खान, दिवाकर परिमल, अमर लाखे, आनंद भस्मे, अनुप कावळे यांनी केली.