शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन महामंडळाला पडला सेवेचा विसर

By admin | Updated: August 12, 2016 01:37 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रिदवाक्याचा वापर करीत राज्यातील गावागावातील पोहचलेल्या बससेवेला प्रवाश्यांच्याव सेवेचा विसर पडल्याचे

विद्यार्थ्यांची तारांबळ : चार तास प्रतीक्षा तरीही बसचा ठावठिकाणा नाही बोरधरण : प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रिदवाक्याचा वापर करीत राज्यातील गावागावातील पोहचलेल्या बससेवेला प्रवाश्यांच्याव सेवेचा विसर पडल्याचे सेलू येथे दिसून आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या या अनागोंदीचा फटका शाळकरी मुलांना बसला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत बस आली नसल्याने बसच्या प्रतीक्षेत या विद्यार्थ्यांना सेलू बसस्थानकावर ताटकळत राहावे लागले. या प्रकाराची माहिती भाजपाच्या सेलू शहराचे अध्यक्ष वरूण दप्तरी यांना मिळताच त्यांनी बसस्थानकाकडे धाव घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करीत परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी करून या विद्यार्थ्यांना त्यांचे घर गाठण्याची सोय करून दिली. शिवाय या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणीही या विद्यार्थ्यांच्या पालकांसह सेलूतील नागरिकांनी केली आहे. बोरधरण येथील विद्यार्थी शिक्षणासाठी सेलू येथे येतात. शाळा सुटल्यानंतर हिंगणीकडे जाणारी बोरधरण-आमगाव बस सेलू बसस्थानकावरून सायंकाळी ५ वाजता सुटते. या बसने विद्यार्थी आपल्या गावी जातात; पण बुधवारी ही बस सेलू बसस्थानकावर आली नाही. आता येईल मग येईल, अशी अशा करीत विद्यार्थी बसस्थानकावर थांबले; मात्र बसचा पत्ता नाही. बसस्थानकावर विद्यार्थी असताना नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ७ वाजता कार्यालय बंद करून बसस्थानक सोडले. विद्यार्थी ज्या बसची प्रतीक्षा करीत होते ती बस कधी येणार हे सांगितले नाही. एवढेच नाही तर त्यांच्याकडून साधे सौजन्यही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले नाही. बसस्थानकावर नियोजित वेळेत बस आली नाही तेव्हा प्रयत्न करण्याची गरज होती, तसेही त्यांनी केले नाही. रात्रीचे आठ वाजल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अश्यातच सेलू शहर भाजपा अध्यक्ष वरूण दप्तरी यांना एका पालकाने दुरध्वनीवर झालेल्या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी बसस्थानक गाठत वर्धा येथील आगार प्रमुखांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांना सेवेचा पडलेल्या विसराची आठवण करून दिल्यानंतर रात्री ८.४५ वाजता बसस्थानकावर बस पोहोचली. रात्री उशिरा विद्यार्थी आपल्या स्वगृही परतले.