शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

ट्रान्सफॉर्मरच्या आगीने वीज पुरवठा प्रभावित

By admin | Updated: September 20, 2016 01:11 IST

बोरगाव (मेघे) लगतच्या सिद्धार्थ नगर येथील २२० केव्हीच्या सबस्टेशनला सोमवारी आग लागताच शहरात

बोरगाव येथील सबस्टेशनला आग : दुरूस्तीच्या कामात पावसाचा खोडा; वर्धा शहरात काळोख वर्धा : बोरगाव (मेघे) लगतच्या सिद्धार्थ नगर येथील २२० केव्हीच्या सबस्टेशनला सोमवारी आग लागताच शहरात एकच कल्लोळ माजला. या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सबस्टेशनच्या दिशेने धाव घेतली. पाहता पाहता अख्खे बोरगाव व वर्धा शहरातील नागरिक या केंद्राच्या आवाराजवळ उभे झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. यामुळे वर्धा शहरासह आसपासच्या गावातील वीज पुरवठा काही काळाकरिता प्रभावित झाला होता. सायंकाळी निम्मे वर्धा शहर काळोखात बुडाले होते. या आगीचे लोळ वर्धा शहरातील सोशालिस्ट चौकातून दिसत होते. एवढे मोठे लोळ कशाचे, असे भाव शहरवासीयांच्या चेहऱ्यावर दिसत होते. हे लोळ कशाचे पाहण्याकरिता सारेच त्या दिशेने धावू लागले. नागरिकांचा वाढता लोंढा व कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरिता पोलीस ताफाही दाखल झाला होता. आग आटोक्यात आणण्याची स्थिती असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस आला. असे असतानाही महावितरणचे कर्मचारी व अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. आग आटोक्यात येईपर्यंत वर्धा शहरात काही भागात काळोख होता. आग आटोक्यात आल्यानंतर व पावसाचा जोर ओसरताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी देवळी व भूगाव येथील केंद्रावरून वर्धेकरांकरिता विजेची उपलब्धता करून दिली. तसेच या केंद्रातून यवतमाळ जिल्ह्यात जात असलेला वीज पुरवठा हिंगणघाट व वरोरा येथील केंद्रावरून सुरळीत करण्यात आल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली.(प्रतिनिधी) आगीवर नियंत्रणाकरिता अग्निशमन दलाची धावपळ ४ट्रान्सफार्मरच्या आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता वर्धेसह पुलगाव, देवळी, हिंगणघाट नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या मदतीला उत्तम गल्वा आणि पुलागव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पुलगाव येथील दोन अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. या दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दुरूस्तीचा कालावधी अनिश्चित ४या आगीत कोळसा झालेले ट्रान्सफार्मर किती दिवसात दुरूस्त होईल, याचा कालावधी निश्चित नाही. यामुळे नागरिकांना इतर केंद्रावरून पर्यायी व्यवस्था करून वीज देण्यात येत आहे. ही वीज कोणत्याही क्षणी बंद वा चालू होण्याची शक्यता आहे. ४आपला विद्युत पुरवठा कायम राहावा, याकरिता नागरिकांनी वीज वापर कमी करावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे. जळालेले ट्रान्सफार्मर सुरू होताच वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे महावितरणच्यावतीने कळविण्यात आले आहे.