शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

डिसेंबरमध्ये जिल्हाकचेरीचे स्थानांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:47 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी २५.४६ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परिणामी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देनवीन इमारत तयार होणार : तहसीलच्या इमारतीतून चालणार कामकाज

ऑनलाईन लोकमत वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी २५.४६ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परिणामी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत तोडली जाणार असल्याने हे कार्यालय तहसील कार्यालयासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. येथूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुमारे १८ विभागाचे कामकाज चालणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाची सध्याची इमारत ही इंग्रज कालीन आहे. ती जीर्ण झाल्यामुळे व पावसाळ्याच्या दिवसात ती अनेक ठिकाणी गळत असल्याने येथील अधिकारी व कर्मचाºयांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही जीर्ण इमारत अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांच्या दृष्टीने धोक्याची ठरत होती. परिणामी, सुसज्य अशा नवीन इमारतीच्या निर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला होता. या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.जुनी इमारत तोडून त्याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत तयार करताना कुंपनभिंत, बगीचा, वाहनतळ आदींची निर्मितीही करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी जुन्याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत तयार होणार असल्याने जुनी इमारत पाडली जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सदर कार्यालयातील सुमारे १८ विभाग सिव्हील लाईन भागातील सध्याच्या जिल्हाकचेरी समोरील तहसील कार्यालयासाठी तयार केलेल्या नवीन इमारतीत येत्या डिसेंबर अखेर स्थलांतरील केले जाणार आहेत. त्यासाठी मार्ग मोकळा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी प्रयत्नही करीत आहेत.१८ विभाग जाणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील इमारतीतजुनी इमारत तोडून तेथे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत तयार केली जाणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना, लेखा, नैसर्गिक आपत्ती, जमीन, नझुल, शेतकरी पॅकेज, लोकशाही दिन, बजेट, करमणुक कर, प्रेषक, वित्त, एनआयसी, सेतू, संगोया, गृह, न.पा. प्र., नियोजन, नाझर विभाग तहसील कार्यालयासाठी तयार केलेल्या नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. तेथूनच नवीन इमारत पूर्ण होईस्तोवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज चालणार आहे. शिवाय तहसील कार्यालयासाठी तयार केलेल्या नवीन इमारतीत हिवाळी अधिवेश संपताच जाण्यासाठी मार्ग मोकळा व्हावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी प्रयत्नही करीत आहेत.खासदारांसह आमदारांनी रेटली नवीन इमारतीची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयाला सुसज्ज इमारत मिळावी म्हणून आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार यांच्यासह खा. रामदास तडस यांनी सरकार दरबारी प्रयत्न केले. राज्याचे वित्त मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयावर सकारात्मकता दर्शवित हा विषय मार्गी लागण्यास मदत केली आहे.मुख्यमंत्र्यांचा वेळ घेण्याचा प्रयत्न सुरूतहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी तथा जिल्हाकचेरीच्या नवीन इमारतीच्या भुमिपूजनासाठी जिल्हास्तरावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा डिसेंबर अखेरचा वेळ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.