अपघाताचा धोका : नागरिकांना पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा सेवाग्राम : म्हाडा कॉलनी परिसरातील कच्च्या रस्त्यावरील गिट्टी पूर्णत: उघडी पडली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्याची डोके दुखी वाढली आहे. रस्त्याचे डांबरीकरण केव्हा होणार असा प्रश्न येथील नागरिकांससमोर पडला आहे. सेवाग्राम-वर्धा मार्गावर म्हाडा कॉलनी आहे. मुख्य मार्गावरून आयटी पार्कच्या बाजूने एक रस्ता म्हाडा कॉलनीकडे गेला आहे. तेराव्या वित्त आयोगांतर्गत पंचायत समितीस्तर १३-१४ अंतर्गत मुख्यमार्ग ते बाबाराव वानखेडे यांच्या घरापर्यंत माती व गिट्टीचा रस्ता बनविण्यात आला होता. त्या रस्त्याची आता दुरवस्था झाली असून रस्त्यावरील गिट्टी पूर्र्णत: उखडून गेली आहे. यावरून चालणेही कठीण झाले असून लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे. वरूड ग्रामपंचायत अंतर्गत एकच सिमेंट रस्ता दोनदा बनविण्यात आला. पण सदर रस्त्याचे काम अद्यापही होत नसल्याने हे निवडणूक जवळ आल्यानंतरच होईल काय असा प्रश्न रहिवाश्यांना पडला आहे. सदर रस्त्याचे तात्काळ पक्के बांधकाम व्हावे अशी मागणी येथील नागरिक वारंवार करीत आहेत.(वार्ताहर)
रस्ता उखडल्याने रहदारीस अडथळा
By admin | Updated: July 30, 2016 00:36 IST