शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात

By admin | Updated: February 4, 2017 00:20 IST

येथील गिरड मार्गावर टी पॉर्इंटवर रात्रीच्या सुमारास जनावरे घेवून जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला.

कोरा-गिरड टी पॉर्इंटवरील घटना : नऊ जनावरांचा मृत्यू; तीन गंभीर कोरा : येथील गिरड मार्गावर टी पॉर्इंटवर रात्रीच्या सुमारास जनावरे घेवून जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात नऊ जनावरांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना गुरुवारी रात्री घडली. कोरा-चिमूर मार्गावरून रात्रीच्या सुमारास कत्तलखान्याकडे जनावरे नेणाऱ्या ट्रकला कोरा -गिरड टी पॉर्इंटवर अपघात झाला. या अपघातग्रस्त ट्रकची पाहणी केली असता यात तब्बल २२ जनावरांची कोंबून वाहतूक होत असल्याचे दिसून आले आहे. अपघातादरम्यान चौकशी केली असता यातील नऊ जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. तर तीन जनावरे गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले आहे. या मृत जनावरांची अंदाजे किंमत १ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. रात्रीच्या सुमारास जात असलेल्या एनएल-०२ एन-६८१३ क्रमांकाच्या ट्रक चालकाचे संतुलन गेल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात होताच ट्रक चालक आणि वाहकाने घटनास्थळाहून पळ काढला. ट्रकमधील उर्वरीत जनावरांना गवते महाराज यांच्या पावणगाव गोशाळेत पाठविण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन केले असून जनावरांचा दफनविधी करण्यात आला. वृत्तालिहेपर्यंत चालकाचा तपास लागला नव्हता. अधिक तपास गिरड पोलीस करीत आहे.(वार्ताहर)