शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर ठरताहेत माकडांना सुरक्षित ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:50 IST

सध्या शेती हिरवीगार झाली आहे. चणा, गहू व काही प्रमाणात कपाशी, तूर ही पिके शेतात आहेत. परिसरात चणा, गव्हाचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे; पण माकडांच्या उपद्रवामुळे सदर पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान : शेतात घालतात धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जा.) : सध्या शेती हिरवीगार झाली आहे. चणा, गहू व काही प्रमाणात कपाशी, तूर ही पिके शेतात आहेत. परिसरात चणा, गव्हाचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची अपेक्षा आहे; पण माकडांच्या उपद्रवामुळे सदर पिकांचे नुकसान होत आहे. परिणामी, शेतकरी त्रस्त आहेत.चिकणी, पडेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात अति उच्च विद्युत दाबाच्या टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. सदर टॉवर माकडांचे निवासस्थानच झाले आहे. माकड टॉवरवरच ठाण मांडून बसतात. शेतकरी शेतात असेपर्यंत माकड टॉवरच असतात; पण शेतकरी शेतातून निघताच माकडांचा पिकांमध्ये धुडगूस सुरू होतो. यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. टॉवरवरून हुसकावण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करतात; पण माकडांवर याचा काहीही परिणाम होत नाही. शेतकरी टॉवरवर चढू शकत नसल्याने बांबूचा वापर करून माकडांना टॉवरवरून उतरविण्याचा प्रयत्न केला जातो; पण माकड बांबू पाहून पुन्हा वर चढतात. फटाकेही फोडले जातात. त्या आवाजाला माकडे घाबरतातही; पण केवळ इकडून तिकडे हालचाल करतात. टॉवरच्या खाली उतरत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.अस्मानी व सुल्तानी या दोन्ही संकटानी यंदा शेतकरी खचला आहे. सोयाबीन परतीच्या पावसाने गेले तर कपाशी बोंडअळीने फस्त केले. तुरीही अल्पावधीतच वाळत आहेत. आता चणा, गहू वन्य प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. शासनाकडून शेतमालाला खर्चानुसार भावही मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे.