शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

माऊंट अन्नपूर्णा शिखरावर फडकविला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:14 IST

महाराष्ट्र बटालियनचे एनसीसी अधिकारी तथा भारत स्काऊटस् आणि गाइडस्चे जिल्हा आयुक्त प्रा. मोहन गुजरकर यांच्यासह महाराष्ट्रातील आठ पर्वतारोहकांनी नेपाळमध्ये असलेल्या जगातील आठव्या क्रमांकाच्या माऊंट अन्नपूर्णा या १३ हजार ५०० फुट उंच शिखरावर यशस्वी चढाई करून तेथे भारताचा तिरंगा फडकाविला आहे.

ठळक मुद्देआठ पर्वतारोहकांच्या साहसाला यश : हिमगिरी ट्रेकर्स फाऊंडेशनचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र बटालियनचे एनसीसी अधिकारी तथा भारत स्काऊटस् आणि गाइडस्चे जिल्हा आयुक्त प्रा. मोहन गुजरकर यांच्यासह महाराष्ट्रातील आठ पर्वतारोहकांनी नेपाळमध्ये असलेल्या जगातील आठव्या क्रमांकाच्या माऊंट अन्नपूर्णा या १३ हजार ५०० फुट उंच शिखरावर यशस्वी चढाई करून तेथे भारताचा तिरंगा फडकाविला आहे.चढाईकरिता अत्यंत कठीण पातळीचे मानले जात असलेल्या माउंट अन्नपूर्णा शिखराच्या बेस कॅम्प पर्वतरोहन अभियानाचे आयोजन मुंबईच्या हिमगिरी ट्रेकर्स फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. माउंटेन गाईड रिद्द बहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अभियान राबविल्याचे सांगण्यात आले.सदर अभियानाचा प्रारंभ ११ मे रोजी नेपाळमधील पोखरा येथून झाला. चढाई दरम्यान, नयापूल, टिरखेदुंगा, उलेरी, गोरेपाणी, ताडेपाणी, छॉमरॉग, बांबू, मच्छापूरमध्ये या शिखरांना पादांक्रत करुन १७ मे रोजी दुपारी १.४० वाजता १३ हजार ५०० फुट उंचीवर स्थित असलेल्या माउंट अन्नपूर्णा शिखराच्या बेस पर्यंतची यशस्वी चढाई करण्यात आली. परतीची चढाई अन्नपूर्णा ते पोखरा अंतर चार दिवसांत पूर्ण करुन २२ मे रोजी अभियान यशस्वी करण्यात आले.माउंट अन्नपूर्णा शिखर हिमालय पर्वत रांगेत आहे. इतकेच नव्हे तर हा भाग चढाईकरिता कठीण, निरंतर वाहणारा प्रचंड हिमवारा व असुविधाजनक असल्यामुळे फार कमी पर्वतरोहक या शिखराच्या अभियानात सहभागी होतात. परंतु, हिमगिरीच्या ट्रेकर्सनी उच्च मनोबल व अजिंंक्य साहसाच्या जोरावर सदर चढाई यशस्वी करण्यात आली आहे.सदर अभियानात प्रा. मोहन गुजरकर यांच्यासह मुंबई येथील संतोष तेलंगे, राजीव गर्गे, वासुदेव डोबरकर, अनंत कामत, डॉ. श्रीनिवास कुलकर्णी, सुहास म्हात्रे आणि सुभाष कुलकर्णी यांचा समावेश होता, असे प्रा. मोहन गुजरकर यांनी कळविले आहे. प्रा. गुजरकर यांचा हा साहस इतरांना प्रेरणा देणारा ठरत आहे.दोन ठिकाणी यापूर्वी केली चढाईकॅप्टन गुजरकर यांनी मे २०१६ मध्ये माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प तर जून २०१७ मध्ये माउंट नंदादेवी बेस पर्यंतची चढाई यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. ते हिमालय पर्वतारोहण मोहिमेचे आयोजन गत २५ वर्षांपासून करत आहेत. गुजरकर प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष असून देवळीच्या एसएसएन जावंधिया महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्याकडे गृहरक्षक दलाचा जिल्हा समादेशक म्हणून कार्यभार असून त्यांचे धाडस इतरांना प्रेरणा देणारेच आहे.

टॅग्स :Everestएव्हरेस्ट