शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

महिलांनी जागृत रहावे ही काळाची गरज

By admin | Updated: August 14, 2016 00:31 IST

महिलांनी स्वत: जागृत रहावे ही काळाची गरज झाली आहे. विकासात्मक भूमिका ठेवत कुठल्याही क्षेत्रात वर्चस्व निर्माण करणे हेच ध्येय ठेवायला हवे.

वंदना पळसापूरे : स्तनपान फायदे व महत्त्व तसेच गैरसमज यावर मार्गदर्शन वर्धा : महिलांनी स्वत: जागृत रहावे ही काळाची गरज झाली आहे. विकासात्मक भूमिका ठेवत कुठल्याही क्षेत्रात वर्चस्व निर्माण करणे हेच ध्येय ठेवायला हवे. असे मत डॉ. वंदना पळसापूरे यांनी मांडले. न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज येथील गृहअर्थशास्त्र विभागातर्फे महिलांसाठी ‘स्तनपान फायदे व महत्त्व व त्यामधील गैरसमज’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील स्त्रिरोग तज्ज्ञ डॉ. लिना बीरे तसेच प्राचार्य डॉ. प्रशांत कडवे, डॉ. वंदना पळसापूर आणि गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. कांचन इंगोले उपस्थित होत्या. स्तनपान कसे आवश्यक व त्याचे फायदे, भावी पिढी त्यावर कशी अवलंबून आहे. यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्त्रियांच्या मनात असलेले गैरसमज दूर केले. डॉ. बीरे यांनी विषयाशी निगडीत सर्व मुलींच्या समस्या, त्यांचे भावी आयुष्य, महिलांचा विकास या विषयावर सुद्धा योग्य मार्गदर्शन केले. स्त्रियांनी सक्षम होणे ही खरी काळाची गरज, असे मत त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मांडले. गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कांचन इंगोले यांनी महिलांनी सौंदर्य राखून स्वत:ची रक्षाकरणे शिकायला हवे. तसेच समाजात स्त्री शक्तीला वाढविण्याचे कार्य सतत चालू ठेवणे गरजेचे आहे, असे मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्रेहल गूजरकर यांनी केले, तर आभार प्रा. चेतना बोबडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. काळे, प्रा. उघडे, प्रा. लांबट, प्रा. उल्हे, प्रा. वरटकर व विद्यार्थी उपस्थित होते.(प्रतिनिधी) शालोम नर्सिंग स्कूल वर्धा शालोम नर्सिंग स्कूल समता नगर येथे येथे स्तनपानाचे महत्त्व, स्तनपानाची सुरुवात, वेळ व बाळाला, आईला होणारे फायदे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सात दिवस निरनिराळ्या प्रकारे कार्यक्रम राबविण्यात आले. यावेळी बहादुरे, दामले, पाटील, तराळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी स्तनपान विषयावर चर्चा, पोस्टर कलेक्शन, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, बक्षीस व निरोप समारंभ पार पडले. तसेच उपस्थितांचे आभार अंकिता गाडगे यांनी मानले.