शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील लोकप्रिय गायकावर शेळ्या राखण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:41 IST

आपल्या सुरेल आवाजाने अवघ्या विदर्भ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या कलावंतांवर पोटापाण्यासाठी शेळ्या राखण्याची वेळ आली असल्याचे वास्तव वर्धा जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देअनेक पुरस्कारांनी झाला होता गौरव

सचिन देवताळे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपल्या सुरेल आवाजाने अवघ्या विदर्भ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या कलावंतांवर पोटापाण्यासाठी शेळ्या राखण्याची वेळ आली असल्याचे वास्तव वर्धा जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. प्रल्हाद हटकर असे या कलावंताचे नाव असून त्यांच्यासारख्या राज्यातील अन्य काही कलावंतावरही आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने उपासमारीचीही वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील कलावंतांना आधार देण्यासाठी सरकारने योग्य उपाय योजना करण्याची गरज असल्याची खंत हटकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.विदर्भातील संगीत क्षेत्रात प्रल्हाद हटकर यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांना प्रसिद्ध गायक म्हणून त्यावेळी ओळखही मिळाली. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या प्रल्हाद हटकर यांचे अनेक चाहतेही निर्माण झाले. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे सध्या त्यांच्यावर शेळ्या राखण्याची वेळ आली आहे. ठिकठिकाणी आयोजित होणाऱ्या प्रल्हाद हटकर यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील प्रेक्षक मोठी गर्दी करायचे. इतकेच नव्हे तर गीत व भजन प्रेमी त्यांनी सादर केलेली रचना ऐकण्यासाठी यायचे. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र, घरची परिस्थिती जेमतेम असल्याने व उपजीविकेचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने त्यांना गायन क्षेत्राकडे पाठ दाखवावी लागली. सध्या ते शेळ्या राखून स्वत:सह कुटुंबियांचे पालन-पोषण करीत आहेत.‘सारे रिश्ते नाते सब छोड के आ गयी’ कानावर पडताच श्रोते व्हायचे मंत्रमुग्धप्रल्हाद हटकर यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला श्रोते एकच गर्दी करायचे. कार्यक्रमादरम्यान प्रल्हाद हटकर यांनी गायलेले नागिन या हिंदी चित्रपटातील ‘सारे रिश्ते नाते सब छोड के आ गयी’ हे गीत ऐकून श्रोतेही मंत्रमुग्ध व्हायचे, हे विशेष.

मानधनाची प्रतीक्षाअनेक पुरस्कार प्राप्त गायक प्रल्हाद हटकर यांना कलावंतांसाठी असलेल्या शासकीय मानधन सुरू करण्यात आलेले नाही. ते शासकीय योजनेपासून वंचित असून त्यांना सदर मानधनाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक