शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचा शेळ्यांच्या कळपावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:05 IST

ऑनलाईन लोकमतआकोली : खरांगणा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या सुुसुंद गावानजीक नाल्याच्या काठावर चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. यात चार शेळ्यांचा फडशा पाडला. त्या वाघासोबत आणखी एक वाघ असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनास्थळी सहाय्यक वनसंरक्षक सुहास बडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एच. ताल्हन, वनपाल दिनकर पाटील हे ताफ्यासह दाखल झाले. गावालगत असलेल्या या वाघाला जंगलात ...

ठळक मुद्देचार शेळ्यांचा पाडला फडशा : गावानजीकच्या घटनेमुळे दहशत

ऑनलाईन लोकमतआकोली : खरांगणा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या सुुसुंद गावानजीक नाल्याच्या काठावर चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. यात चार शेळ्यांचा फडशा पाडला. त्या वाघासोबत आणखी एक वाघ असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनास्थळी सहाय्यक वनसंरक्षक सुहास बडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एच. ताल्हन, वनपाल दिनकर पाटील हे ताफ्यासह दाखल झाले. गावालगत असलेल्या या वाघाला जंगलात हाकलण्याचे प्रयत्न सुरू आहे.गावापासून हाकेच्या अंतरावर नरेश लेंडे, राजू उईके, सुरेश गवळी, राकेश डवले हे त्यांच्या शेळ्या नदी काठावर चारत होते. येथे अचानक दोन वाघांनी कळपावर हल्ला केला. घाबरलेल्या शेळी पालकांनी मोठ्याने ओरडत ग्रामस्थांना माहिती दिली. गावकरी काठ्या घेवून येताच वाघ नदी नाल्यातील झुडपात गेले. तोपर्यंत चार शेळ्या ठार झाल्या होत्या. सदर घटनेने सुसुंद व सुसुंद (हेटी) या दोन्ही गावात दहशत पसरली आहे.वनविभागाचे कर्मचारी सायंकाळपर्संत या भागात फटाके व बारुद फोडून या दोन्ही वाघांना जंगलाकडे हाकलण्याचा प्रयत्न करीत होते.सकाळी १० वाजता वाघाने केलेल्या या हल्ल्यात चार शेळ्यांचा फडशा पाडला. पट्टेदार वाघांसोबत वयात आलेला दुसरा वाघ होता, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्याला जंगलाकडे हाकलण्याचे प्रयत्न सुरू आहे.-दिनकर पाटील, वनपाल

टॅग्स :Tigerवाघ