शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

देवळी शिवारात व्याघ्र दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:40 IST

तालुक्यातील आंबोडा व कोळोणा (चोरे) या ठिकाणी दोन जनावरांचा बळी घेवून दहशत पसरविणारा वाघ देवळीत दाखल झाला. देवळीपासून तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या एकपाळा शिवारातही या वाघाने गुरुवारच्या पहाटे बैलाचा फडशा पाडला. त्यानंतर हा वाघ याच शिवारात ऐटीत बसून असलेला पाहिल्याने परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. पण, वनविभाग या वाघापासून लांबच असल्याने त्यांच्या कार्यपध्दतीबाबत रोष व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देएकपाळा परिसरात बैलाचा पाडला फडशा : दोन दिवसात तिसरा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील आंबोडा व कोळोणा (चोरे) या ठिकाणी दोन जनावरांचा बळी घेवून दहशत पसरविणारा वाघ देवळीत दाखल झाला. देवळीपासून तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या एकपाळा शिवारातही या वाघाने गुरुवारच्या पहाटे बैलाचा फडशा पाडला. त्यानंतर हा वाघ याच शिवारात ऐटीत बसून असलेला पाहिल्याने परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. पण, वनविभाग या वाघापासून लांबच असल्याने त्यांच्या कार्यपध्दतीबाबत रोष व्यक्त होत आहे.एकपाळा शिवारातील सुधाकर मारोतराव उगेमुगे यांच्या शेतातील गोठ्यासमोर बोरीच्या झाडाला बैल बांधून होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास या बैलावर झडप घेऊन वाघाने त्याच्या नरडीचा घोट घेतला. साडेचार वर्षाच्या या बैलाला वाघाने ७९ फुटापर्यंत दुसऱ्या शेतात ओढत नेत त्याच्या मानेचे लचके तोडले. उगेमुगे सकाळी ६ वाजता शेतात गेल्यावर त्यांना बैलाची शिकार केल्याचे लक्षात आले. या शिकारीचा आजुबाजूला वाघाच्या पाऊल खुणा दिसून आल्या. याबाबतची त्यांनी लगेच वनविभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सकाळी ९ वाजता दरम्यान वनविभागाचे कर्मचारी व पत्रकारही वृत्त संकलनासाठी घटनासथळी दाखल झाले. यावेळी लोकमतचे प्रतिनिधी हरिदास ढोक वृत्त संकलन करीत असतांना त्यांची नजर शिकारीपासून शंभर फुट अंतरावर ऐटीत बसून असलेल्या वाघावर पडली. त्यांनी ही बाब लगेच वनरक्षक व इतर पत्रकारांच्या लक्षात आणून दिली. पाच वर्ष वयोगटातील अतिशय भारदस्त पट्टेदार वाघाचे दर्शन ‘याची देही याची डोळा’ घडल्याने सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. घामाघूम झालेल्यांनी वनविभागाच्यावतीने वाघाला हुसकावून लावण्याकरिता बारुद फोडून आवाज केला. तसेच ध्वनिक्षेपणावरून आजूबाजूच्या शेतकºयांनाही सतर्क करण्यात आले. लगतच्या शेतातच सोयाबीनची मळणी सुरु असल्याने उपस्थितांनी सोयाबीनच्या गंजीवर चढण्यास सांगितले. त्यामुळे सर्वांनीच त्या गंजीवर चढून आपल्याला सुरक्षीत करुन घेतले. असे असले तरीही वाघाने चांगलीच दहशत पसरली आहे.एकपाळा शिवारातच वाघाचा मुक्कामहा वाघ सध्या एकपाळा हनुमान मंदिरालगतच्या नाल्यात झुडूपांमध्ये दबा धरून असल्याचे संकेत मिळत आहे. या भागातील वानरांनी झाडावर एकच गोंधळ केल्यामुळे याबाबीला पुष्टी मिळत आहे. शेतकरी, शेतमजुर व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी हा परिसर अतिशय वर्दळीचा आहे. त्यामुळे वनविभागाकडून या कामात होत असलेली दिरंगाई अक्षम्य ठरत आहे. या वाघाच्या गळ्यात ट्रॅकींग कॉलर नसल्याने हा वाघ वनविभागाच्या गिनतीत नसल्याचे सांगितले जात आहे....तर तुम्ही येऊन काम करा!एकपाळा शिवारात सकाळी वाघ दिसून आल्यानंतर वार्तांकनासाठी आलेल्यांनी ही बाब वन परिक्षेत्र अधिकारी बनसोड यांच्या लक्षात आणून दिली. याठिकाणी वनविभागाचे फक्त पाच वनरक्षक कार्यरत असून त्याच्याकडे कोणतीही व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले.परिसरातील शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण असल्याने याठिकाणी वाघाचे पुढील लोकेशन घेण्यासाठी ड्रोन कॅमेºयाची व गुंगीचे औषध देण्यासाठी शुटरची व्यवस्था करण्याबाबत सुचविण्यात आले. परंतु आमच्या पेक्षा तुम्हाला जास्त समजते का, ऐवढेच आहे तर तुम्ही येवून काम करा, असे उर्मट उत्तर बनसोड यांनी भ्रमणध्वनीवरुन दिल्याने रोष व्यक्त होत आहे.