शहरं
Join us  
Trending Stories
1
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
2
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
3
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
4
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
5
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
6
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
7
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
8
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
9
IND vs SA : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! मोर्कोसह पहिल्या डावात द.आफ्रिकेनं साधला मोठा डाव
10
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
11
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
12
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
13
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
14
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
15
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
16
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
17
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
18
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
19
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
20
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

वाघाची दहशत; आमदारांच्या उपस्थितीत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:30 IST

मागील सात दिवसांपासून तालुक्यात वाघाने ठाण मांडुन दोन पाळीव जनावरांना ठार केले. यामुळे वडनेर परिसरातील गावांमधील नागरिक व शेतकरी तसेच शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देवाघाला पकडण्याची मागितली परवानगी : वरिष्ठांच्या सूचनेवरून होणार कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : मागील सात दिवसांपासून तालुक्यात वाघाने ठाण मांडुन दोन पाळीव जनावरांना ठार केले. यामुळे वडनेर परिसरातील गावांमधील नागरिक व शेतकरी तसेच शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पाश्वभूमिवर शनिवारी आ. समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली.सदर बैठकीला नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, तहसीलदार सचिन यादव, वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, वडनेरचे ठाणेदार आशीष गजभिये, पं. स सभापती कोल्हे, पं. स. सदस्य डॉ. विजय पर्बत, जि.प. सदस्य माधव चंदनखेडे, मिलिंद कोपुलवार, न. प. सभापती नरेश ईवनाथे, नगरसेवक प्यारू कुरेशी, अमोल खंदार, संदीप सुरकार आदींची उपस्थिती होती. या वाघाने आतापर्यंत दोन पाळीव जनावरे गतप्राण केली असून परिसरात वाघाची दहशत आहे. संभाव्य धोका लक्षात घेवून आम्ही वडनेर परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय किमान दोन दिवस तरी शेतात न जाण्याची विनंती आम्ही शेतकºयांना केली आहे. शिवाय दहा सदस्यीय वन विभागाचे विशेष पथक वाघाच्या मागावर आहेत. शेत शिवारात वाघाचा मुक्तसंचार चिंतेचा विषय असल्याने वाघाला तातडीने पकडण्यासाठी आम्ही संबंधितांना परवानगी मागितली असल्याचे यावेळी उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांनी सांगितले. वाघाला आपल्या नैसर्गिक अधिवासात जाण्यासाठी ग्रामस्थांनी वाट मोकळी करून द्यावी, असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा होत वर्धा जिल्ह्यातील सावंगी (हेटी) शिवारात दाखल झालेला साडेतीन वर्षीय वाघाने मागील आठ दिवसांपासून वडनेर परिसरात ठाण मांडले आहे. अनेकांना या वाघाचे दर्शन झाले असल्याचे आपल्याला ग्रामस्थांनी सांगितल्याचे याप्रसंगी वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांनी स्पष्ट केले. शिवाय आपण स्वत: लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.

टॅग्स :TigerवाघHinganghatहिंगणघाट