लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद भागात होणारे वाघाचे हल्ले शेतकरी व गोपालकांच्या व्यवसायावर आलेले नवे संकट आहे. या भागात आतापर्यंत वाघाने पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते. ते भक्षही ठरले; मात्र रणजित निकोडे व ईश्वर महाडोळे या दोन युवकांवरही वाघाकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला. या संदर्भात आज जिल्हा उपवनसंरक्षक कार्यालय गाठून त्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याचे निवेदन सादर करण्यात आले.सुसूंद, सुसूंद (हेटी), बोरगाव (गोंडी) या भागात वाघाच्या जोडीने चांगलाच उच्छाद मांडला आहे. येथील लोकांचा गोपालन हा मुख्य जोडधंदा आहे. पण सततच्या हल्याने गोपालक व शेतकरी त्रस्त झाले आहे. आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात रोही, गोºहे व गाईचा जीव गेला. ग्रामस्थांनी य संदर्भात आ. अमर काळे व वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एस. ताल्हन यांना निवेदन दिल्यानंतर वाघांना हुसकावून न्यू बोर व्याघ्र प्रकल्पात हाकलले होते. काहीच दिवसात वाघाने आपला मोर्चा पुन्हा सुसूंद गावाकडे वळवून वैद्य यांच्या शेतातील गायीवर हल्ला करून फस्त केली. सध्या दोन्ही वाघांचा मुक्काम मदना धरणाच्या मागील बाजूस असलेल्या वासुदेव चितोडे व भीमराव डवले यांच्या शेतात आहे. या वाघाच्या मागावर असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत करणाºया रणजित निकोडे व ईश्वर महाडोळे या दोन युवकांवर वाघाने हल्ल्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थ संतप्त आहे. यावेळी निखील काकडे, वासुदेव चितोडे, शंकर निकोडे, अनिल वाटगुळे, ईश्वर महाडोळे, बाबाराव कांबळे व प्रकाश उईके उपस्थित होते.
वाघाचा युवकावर हल्ल्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:16 IST
खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद भागात होणारे वाघाचे हल्ले शेतकरी व गोपालकांच्या व्यवसायावर आलेले नवे संकट आहे. या भागात आतापर्यंत वाघाने पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते.
वाघाचा युवकावर हल्ल्याचा प्रयत्न
ठळक मुद्देसुसुंदमध्ये एक महिन्यांपासून वाघाचा धुमाकुळ