शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भर उन्हाळ्यातही त्यांनी जगविले वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:06 IST

येथील सामाजिक वनीकरणच्या केळझर येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत भर उन्हाळ्यात पाण्याची जुळवाजुळव करून जगविलेली ६ लाख ६ हजार १६७ रोपे वृक्ष लागवडीसाठी शासकीय, निमशासकीय संस्थांना शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत देण्यात येत आहेत.

ठळक मुद्दे४९ हजार ५०० रोपट्यांची लागवड । सामाजिक वनीकरणची उत्कृष्ट कामगिरी

प्रफुल्ल लुंंगे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील सामाजिक वनीकरणच्या केळझर येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत भर उन्हाळ्यात पाण्याची जुळवाजुळव करून जगविलेली ६ लाख ६ हजार १६७ रोपे वृक्ष लागवडीसाठी शासकीय, निमशासकीय संस्थांना शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत देण्यात येत आहेत. तर सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्याच्या दुतर्फा कॅनल रोडने ४९ हजार ५०० रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन सुरू केले आहे.ग्रामपंचायतीद्वारे तीन-चार वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या लागवडीपैकी दहा टक्केदेखील रोपटी जिवंत नाहीत. मात्र, सामाजिक वनीकरणने उत्कृष्ट नियोजन करीत शंभर टक्के झाडे जगवित त्यांचे संगोपन केले आहे. शेतकरी धुरे पेटविताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना इजा पोहोचवित असल्याने तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या वृक्षांची होळी होतानाचे चित्र मात्र वेदनादायी आहे.सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल आर. एम. दवंडे यांनी यंदा केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांच्याप्रति नागरिकांत आपुलकी वाढली आहे. अधिनस्थ कर्मचाऱ्यांकडे त्यांनी सामाजिक वनीकरणचे काम लोकाभिमुख केले आहे.यंदाच्या प्रखर उष्णतामानात रोपांना जगविण्यासाठी कामावर असलेले सेवानिवृत्त कर्मचारी एन.एस. निखाते यांनी रोपवाटिकेला लागून असलेल्या रमेश कोपरकर यांना विनंती करीत पाईपलाईन टाकून घेतली. मोटारपंपाद्वारे विहिरीतील पाणी रोपवाटिकेसाठी घेवून रखरखत्या उन्हाळ्यात सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून रोपवाटिका हिरवीगार केल्याने त्यांची वनक्षेत्रपाल आर.एम. दवंडे यांनी पाठ थोपटली, हेही तेवढेच खरे आहे.वनरक्षक आर. डी. बहादुरे, वनपालक विश्वास सिरसाट यांनीही या कार्यात अतिशय परिश्रम घेतले. सामाजिक वनीकरणच्या कर्मचाऱ्यांनी जगविलेली रोपे आणि आता लागवडीच्या केले उत्कृष्ट नियोजनाबाबत लागवड अधिकारी (वनक्षेत्रपाल) आर.एम. दवंडे यांचे जीव ओतून काम करण्याच्या पद्धतीचे इतरांनाही अनुकरणे करण्याजोगे आहे.मध्यवर्ती केळझर येथे सन २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीकरिता २५ बाय ४० आकाराच्या पॉली बॅगमध्ये ५८ हजार ६२५ व २० बाय ३० आकाराची पॉली बॅगमध्ये १ लाख ५८ हजार ५४० व १२.५ बाय २५ च्या पॉलीबॅगमध्ये ३ लाख ८९ हजार अशी एकूण ६ लाख ६ हजार १६७ रोपे तयार करण्यात आली. यासाठी १८ मजूरांना रोजगार प्राप्त झाला. योग्य नियोजनामुळे ३३ कोटी वृक्ष लागवडीत ही रोपे लावण्याचे कामी आली. सर्वांच्या सहकार्याने सामाजिक वनीकरण काम समाधानकारक सुरू आहे.आर.एम. दवंडे, वनक्षेत्रपाल,सामाजिक वनीकरण विभाग, सेलू.

टॅग्स :forest departmentवनविभाग