शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून रोकड लांबविणाºया तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:15 IST

चोरट्यांनी शहरातील एटीएममधून ३,७१,५०० रुपये लंपास केले. २६ जून ते ३ जुलै दरम्यान ही चोरी झाली. तक्रारींवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवित तपास सुरू केला. यात १५ सप्टेंबर रोजी तिघांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देहिंगणघाट पोलिसांची कारवाई : ३.७१ लाखांची पळविली होती रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : चोरट्यांनी शहरातील एटीएममधून ३,७१,५०० रुपये लंपास केले. २६ जून ते ३ जुलै दरम्यान ही चोरी झाली. तक्रारींवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवित तपास सुरू केला. यात १५ सप्टेंबर रोजी तिघांना अटक करण्यात आली. विकास उर्फ शिवम राजबहादूर सिंग (२३), विशाल शिवकुमार अग्निहोत्री (१९) व कुलदीप यादव रा. कानपूर उत्तरप्रदेश, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.तीनही चोरटे खासगी वाहनाने २८ जून रोजी शहरात आले. युको बँकेचे एटीएम एनसीआर कंपनीचे असून आरोपींकडील चावी लागत असल्याने ते एलएल गेस्टहाऊस येथे थांबले. तेथे त्यांनी आधार कार्डची सत्यप्रत दिली. रात्री ११.३० नंतर युकोच्या एटीएममधून डुप्लीकेट चावी व इतर लोकांच्या एटीएम कार्डचा आधार घेत पैसे काढले. मशीनची पैसे मोजण्याची प्रक्रिया सुरू होताच वरचे झाकण समोर खेचून आत हात टाकून हे दीड लाख रुपये काढले. यानंतर पुन्हा १ जुलै रोजी तसाच प्रयोग केला. त्यांनी एकूण ३,७१,५०० रुपये काढले.सीसीटीव्ही फुटेजवरून चोरटे शहरात थांबल्याचा संशय आल्याने पोलिसांनी लॉज तपासले. एल.एल. गेस्टहाऊस व अमृत पॅलेसमध्ये कानपूर येथील ओळखपत्र मिळाल्याने संशय आला. बँकेच्या स्टेटमेन्टवरून एटीएम कार्ड कानपूर उत्तरप्रदेशचे असल्याचे दिसून आले. खातेदारांचा शोध घेत चौकशी केली व सीसीटीव्ही फुटेज दाखविले असता ओळख झाली. यावरून तिघांना शिताफीने अटक केली. पोलीस कोठडी घेत साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एम., एसडीपीओ कोल्हे, ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनात जाविद शेख, रामदास चकोले, संदीप महाकाळकर, राहुल देशमुख यांनी केली.मोबाईल चोरट्यास अटक, २.०८ लाखांचा मुद्देमाल जप्तगोमाजी वॉर्डातील शेख जाबीर शेख कादर (२२) हा चोरीचे मोबाईल वापरतो व विक्री करतो, अशी माहिती मिळाली. यावरून डीबी पथकाने त्याला ताब्यात घेत विचारणा केली असता त्याने अल्पवयीन मुलाच्या साथीने अनेक मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २८ मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा २ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., एसडीपीओ कोल्हे, ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनात हमीद शेख, शेखर डोंगरे, रामकिसन इप्पर, सचिन भारशंकर, सायबर सेल वर्धा यांनी केली.