शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

तीन वर्षांत 43 भूमिहीन झाले भूस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेेला सन २००४-०५ पासून राज्यात सुरुवात करण्यात आली. अनुसूचित जाती व नवबैाद्ध प्रवर्गातील दारिद्र रेषेखालील भूमिहीनांना कोरडवाहू ४ एकर तर ओलीताची २ एकर जमीन प्रांरभी ५० टक्के अनुदानावर दिली जात होती. मात्र, १४ ऑगस्ट २०१८ पासून शंभर टक्के अनुदानावर जमीन देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आता शंभर टक्के अनुदानावर जमीन दिल्या जात आहे. योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत जवळपास १२० भूमिहीन भूस्वामी झाले आहेत.

ठळक मुद्देकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेंतर्गत मिळाला लाभ

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षामध्ये अनुसूचित जाती व नवबैाद्ध घटकातील दारिद्र रेषेखालील ४३ भूमिहीन शेतकऱ्यांना कसायला जमीन मिळाल्याने आता ते जमीन मालक झाले आहे. या जमिनीमुळे त्यांना उत्पादनाचे साधन मिळाले आहे.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेेला सन २००४-०५ पासून राज्यात सुरुवात करण्यात आली. अनुसूचित जाती व नवबैाद्ध प्रवर्गातील दारिद्र रेषेखालील भूमिहीनांना कोरडवाहू ४ एकर तर ओलीताची २ एकर जमीन प्रांरभी ५० टक्के अनुदानावर दिली जात होती. मात्र, १४ ऑगस्ट २०१८ पासून शंभर टक्के अनुदानावर जमीन देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आता शंभर टक्के अनुदानावर जमीन दिल्या जात आहे. योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत जवळपास १२० भूमिहीन भूस्वामी झाले आहेत. प्रारंभी कोरडवाहू व ओलीताच्या जमिनीकरिता सरसकट एकरी तीन लाख रुपये मिळत होते.  आता नवीन आदेशानुसार कोरडवाहूकरिता ५ लाख रुपये तर ओलीताच्या जमिनीकरिता ८ लाख रुपये अनुदान मिळतात. या योजनेकरिता जमिन विकत घेणे आणि लाभार्थ्यांना वाटप करणे याकरिता तालुका स्तरीय व जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी असून जिल्हा स्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. शासनाकडून जमिनीला मिळणारे दर कमी असल्याने या योजनेकरिता जमिनी देणाऱ्यांचीही संख्या कमी आहे. विशेषत: शासनाचे निकष तपासूनच जमीन खरेदी केली जातात. जिल्ह्यात काही मोजक्याच तालुक्यातून प्रस्ताव येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही योजना जिल्ह्याकरिता असून जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील जमिनीचे प्रस्ताव यावे आणि इतरही तालुक्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता प्रशासन प्रयत्नरत आहेत.

जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील जमीन या योजनेकरिता मिळावी, याकरिता विभागचे प्रयत्न आहेत. तसेच भूमिहीनांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे, याकरिता जास्तीत जास्त अनुसूचीत जातीतील लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न असणार आहे. गेल्या तीन वर्षात ४३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून ते शेती कसत आहेत.प्रसाद कुळकर्णी, सहायक आयुक्त, समाजकल्याण

 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंर्गत मला गावापासून दीड किलोमीटर अंतरावरच चार एकर जमिन मिळाली आहे. टाकळी (दरणे) शिवारात शेती असून मोलमजुरी आणि जमिनीच्या भरोवशावर सहा जणांच कुटुंब सांभाळत आहे. या जमिनीमुळे मोठा आधार मिळाला आहे.वसंता खांडस्कर, लाभार्थी, अल्लीपूर

टॅग्स :agricultureशेती