शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडिट कार्डच्या माहितीचा वापर करून गंडा घालणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 05:00 IST

सुप्रिया झाडे यांना फसवणूक करणाऱ्यांनी फोन करून मी बँकेतून बोलत आहे, तुमचे क्रेडिट कार्ड बंद होणार आहे, ते सुरू ठेवायचे असल्यास कार्ड नंबर सांगा व ओटीपी सांगा असे सांगितले. सुप्रिया यांनी फोन करणाऱ्यावर विश्वास ठेवून सदर माहिती दिली. याच माहितीचा वापर करून आराेपींनी सुप्रिया यांच्या बँक खात्यातून ९९ हजार २७५ रूपये परस्पर काढून त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुप्रिया यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क :वर्धा : क्रेडिट कार्डची माहिती विचारून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींना दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वर्धा पोलिसांच्या सायबर सेल मधील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केली असून दिवाळीच्या तोंडावर पोलिसांकडून करण्यात आलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.विवेकप्रसाद शहा (२१), आकाश गणेश मंडल (२१) व रॉबिन श्याम करोटीया (२१) सर्व रा. दिल्ली, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुप्रिया झाडे यांना फसवणूक करणाऱ्यांनी फोन करून मी बँकेतून बोलत आहे, तुमचे क्रेडिट कार्ड बंद होणार आहे, ते सुरू ठेवायचे असल्यास कार्ड नंबर सांगा व ओटीपी सांगा असे सांगितले. सुप्रिया यांनी फोन करणाऱ्यावर विश्वास ठेवून सदर माहिती दिली. याच माहितीचा वापर करून आराेपींनी सुप्रिया यांच्या बँक खात्यातून ९९ हजार २७५ रूपये परस्पर काढून त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुप्रिया यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती दिली. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सायबर सेलच्या पोलिसांचीही मदत घेण्यात आली. फसवणूक करणारे दिल्ली येथील असल्याची खात्रीदायक माहिती मिळताच वर्धा पोलिसांचे पथक दिल्ली रवाना झाले. पोलिसांनीही पाच दिवस दिल्लीत राहून मोठ्या शिताफीने या तिन्ही ठगबाजांना ताब्यात घेतले. या ठगबाजांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून पोलिसांच्या त्यांच्याकडून तीन मोबाईल, दोन डेबिट कार्ड, बँकेचे पासबुक जप्त केले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, सोमनाथ टापरे, निलेश कट्टोजवार, अनूप कावळे, स्मिता महाजन, निलेश तेलरांधे, आकाश कांबळे यांनी केली. 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस