शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओतील तीनही दलालांची जामिनावर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:24 IST

येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात दक्षता विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी धाड टाकली. कार्यालयातील कागदपत्र ताब्यात घेत चौकशी सुरु करताच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दाणादाण झाली.

ठळक मुद्देपरिवहन कार्यालयात दक्षता विभागाची धाड : अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांची दाणादाण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात दक्षता विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी धाड टाकली. कार्यालयातील कागदपत्र ताब्यात घेत चौकशी सुरु करताच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दाणादाण झाली. तसेच कार्यालय परिसरातही धावपळ उडाली होती. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत चालली. यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले तर एकाला फरार दाखविण्यात आले आहे. ज्या तिघांना अटक करण्यात आली त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.स्थानिक प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळावर असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दक्षता विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत कोलवाडकर यांनी शिकाऊ अनुज्ञप्ती विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात धाड टाकली. त्यात पाच जणांना ताब्यात घेवून चौकशी सुरु केली. चौकशीअंती दोघांना सोडण्यात आले. तर एजंट सुभाष कदम रा. गोंडप्लॉट वर्धा, दिवाकर नागोसे रा. सिंदी (मेघे) व भाष्कर बुटले रा. आष्टी (शहीद) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८ व आर डब्ल्यू. १२० बीपी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तर गजानन रघाटाटे रा. रामनगर हा फरार झाल्याचे सांगण्यात आले. या तिघांनाही शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यावर पोलीस कचेरीतूनच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत कोलवाडकर यांच्यासह वर्धा गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी केली.२३ वर्षानंतर दक्षता विभागाला आली जागउपप्रादेशिक परिवहन कार्यालय प्रतापनगर परिसरात असताना २३ वर्षांपूर्वी दक्षता विभागाने छापा टाकून चौकशी केली होती. तेव्हापासून दक्षता विभागाने या कार्यालयाकडे लक्ष दिले नाही. आता सहायक पोलीस आयुक्त प्रशांत कोलवाडकर यांनी ६ आक्टोंबरला दक्षता विभागाचा पदभार स्विकारताच आरटीओ कार्यालयावर धाड टाकून वचक निर्माण केला आहे. विशेषत: कोलवाडकर यांनी यापूर्वी वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्यातील खाचखळग्याचीही माहिती आहे.आजच्या कारवाईचा अहवाल प्रशासकीय कारवाईकरिता परिवहन आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. तसेच तीन अहवाल आरटीओ नागपूर व मुंबई येथे पाठविण्यात येईल. त्यामुळे परिवहन विभागाकडून योग्य ती कारवाई वर्ध्याच्या उपप्रादेशिक परिवहन विभागावर होईल.- प्रशांत कोलवाडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, (दक्षता ) विभाग परिवहन आयुक्त कार्यालय,मुंबई.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस