शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

थ्री-फेज वीज पुरवठा अनियमित

By admin | Updated: November 23, 2014 23:24 IST

शेतकऱ्यांना सिंचन सुविधेत खंड पडू नये म्हणून भारनियमनाच्या वेळांचे नियोजन करण्यात आले आहे; पण कधी ओव्हरलोड तर कधी ब्रेकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे सिंचन प्रभावित होत आहे़

अंतोरा फिडरमधील प्रकार : १० तास वीज पुरविण्याची मागणीआष्टी (श़) : शेतकऱ्यांना सिंचन सुविधेत खंड पडू नये म्हणून भारनियमनाच्या वेळांचे नियोजन करण्यात आले आहे; पण कधी ओव्हरलोड तर कधी ब्रेकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे सिंचन प्रभावित होत आहे़ हा प्रकार अंतोरा फिडरमध्ये अधिक घडत असल्याने लहानआर्वी येथील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे़ महावितरणने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ याबाबत सहायक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले़गत काही दिवसांपासून थ्री-फेज वीज पुरवठा अनियमित झाला आहे़ यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचे तीनतेरा झाले आहेत़ थ्री-फेज वीज पुरवठ्याची वेळ सोमवार ते गुरूवारी सकाळी ७.४५ वाजेपर्यंत असून शुक्रवार ते रविवार सकाळी १०.४५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे़ यात कधी ओव्हरलोड तर कधी ब्रेकडाऊन होत असल्याने सिंचन तसेच शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे़ शेतकऱ्याला पुरेपूर वीज पुरवठा मिळत नाही. यामुळे सिंचन सुविधा असताना कोरडवाहू शेती करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़ निसर्गाचा लहरीपणा व शासनाचे ढीसाळ धोरण यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे़ यंदा सोयाबीनची नापिकी झाली़ एकरी उत्पादन अत्यल्प आले़ कपाशीवर लाल्या व अन्य रोगांचे आक्रमण झाले़ यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे़ यात वीज बिल भरणे कठीण आहे. वीज पुरवठा असाच अनियमित राहिला तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असेही शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे़ २३० अ‍ॅम्पियर वीज पुरवठा गरजेचा असताना केवळ १३० अ‍ॅम्पियर पुरविला जातो़ यामुळे ओलितही होत नाही आणि शेतकऱ्यांचे मोटर पंपही नादुरूस्त होतात़ अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी यामुळे जळाल्या आहेत़ हा प्रकार टाळण्याकरिता दहा तास थ्री-फेज वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ सात दिवसांच्या आत अर्जाचा विचार न झाल्यास लहानआर्वी सर्कलच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात नमूद केले आहे़ निवेदन सादर करताना लहानआर्वी येथील पीडित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़(प्रतिनिधी)