शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांतच खांब धाराशाही

By admin | Updated: June 27, 2015 02:45 IST

प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना पावसाळ्याआधी विद्युत जोडणी द्या, अन्यथा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, ...

देवळी : प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना पावसाळ्याआधी विद्युत जोडणी द्या, अन्यथा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. कंत्राटदारांनीही कारवाईच्या भीतीपोटी वीजजोडणीचे काम हाती घेवून काही भागात ते पूर्णत्वास नेले. पण पहिल्याच पावसात विद्युत खांबांनी जमिनीवर लोळण घेतली आहे. तर काही तारांच्या जोरावर लोंबकळत आहे. तीन महिन्यांच्या कालावधीतच हे खांब पडल्याने ऐन हंगामात देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांची पेरणी आणि मशागतीची काम खोळंबली आहे.शेकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सिंचनाची आवश्यकता असल्याने शासनाच्या जलपूर्ती आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे दहा शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरी देण्यात आल्या. या सिंचन विहिरीवरील कृषी पंपांना विद्युत पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र्र राज्य विद्युत वितरणकडे तक्रारीही दिल्याचे सांगितले. तक्रारीनंतर वायगाव(नि.) येथील शाखा अभियंता यांनी वीजपुरवठा बंद केला. परंतु खांब उचलण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाला अडचण येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर खांब पूर्ववत उभे करावे, अशी मागणी सोनेगाव येथील शेतकरी करीत आहे. तसेच आडवे पडलेले तारही मशागतीत अडथळे निर्माण करीत असल्याने ते लवकर हटवावे अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे.(प्रतिनिधी) कामाची चौकशी करून कारवाईची मागणीकृषी पंपांना विद्युत पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे रूद्राणी नामक कंपनीला वीज खांब उभारण्याचे कंत्राट देण्यात आले. त्यानुसार रूद्राणी नामक कंपनीने शेतात खांब उभे करण्याचे काम केले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने लगबगीने विद्युत खांब जमिनीत रोवण्यात आले. कंत्राटदारांनी सोनेगाव (बाई) येथील दहाही विहिरीवर वीजपुरवठा करण्यासाठी सिमेंट खांब टाकून विद्युत प्रवाह सुरू केला. आता आपल्या शेतातील विहिरीवरून शेतात ओलित करून पाऊस नसला तरी पिके जगवता येईल अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण पहिल्या पावसातच अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीतच या विहिरीचे खांब जमिनीवर कोसळले.काही ताराचा आधार असल्याने लोंबकळत आहे. याची माहिती शेतकऱ्यांनी वायगाव निपाणी येथील शाखा अभियंत्यांना दिली. त्यांनी गावात जावून या खांबांचा पुरवठा बंद केला पण खांब उचलण्यासाठी पाऊले उचलली नाही. शेतात पडून असलेल्या या खांबामुळे शेतकऱ्यांना मशागत करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. काही शेतकऱ्यांच्या पेरण्याही रखडलेल्या आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे खांब पूर्वस्थितीत आणावे किंवा खांबांना जोडलेले तार काढून मशागतीसाठी शेत मोकळे करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. काही शेतकऱ्यांनी याबबात महावितरणकडे तक्रारीही दिल्याचे सांगितले.वीज वितरण कंपनीने केले हात वरजवळपास वीस पोल जमिनीवर पडले आणि काही लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांनी याची माहिती वायगाव येथील शाखा अभियंत्याला दिली. त्यांनी गावात जावून पाहणी केली. पण खांब उभे करण्याचे आश्वासन देण्याऐवजी याला आम्ही काही करू शकत नाही. हा कंत्राटदाराचा दोष आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधावा. असा सल्ला दिला. इतकेच नाही तर वितरण कंपनीने कंत्राटदाराचे देयकही रोखल्याचे सांगितले. पण या विद्युत वितरण कंपनी आणि कंत्राटदाराच्या भांडणात हताश झालेल्या शेतकऱ्यांचे मरण होत असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.