शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वैमनस्यातून तीन लाखांची घरफोडी

By admin | Updated: June 14, 2017 00:51 IST

आपसी वैमनस्याचा वचपा काढण्यासाठी घरफोडी करून तीन लाखांचा ऐवज पळविल्याची अजब घटना वर्धेत उघड झाली.

अनर्थ टळला : आॅटो, मोपेड व घरातील साहित्याची तोडफोड लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आपसी वैमनस्याचा वचपा काढण्यासाठी घरफोडी करून तीन लाखांचा ऐवज पळविल्याची अजब घटना वर्धेत उघड झाली. या वादातून चोरट्याने दोन आॅटो, दुचाकी व घरातील साहित्याची तोडफोड करून ३५ हजार रुपयांच्या रोखीसह सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास बोरगाव (मेघे) येथील साहु ले-आऊट परिसरात घडली. बोरगाव येथील निलेश मानकर व राजेश जयस्वाल या दोघांत काही कारणातून वाद झाला होता. या वादातूनच महिलेच्या तक्रारीवरून निलेश याच्यावर शहर पोलिसांत भादंविच्या कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकारामुळे निर्माण झालेल्या वैमनस्यातून यापूर्वीही जयस्वाल याने मानकर याची दुचाकी पेटविली होती. सोमवारी निलेशची पत्नी कल्याणी मानकर हिच्या आजी चंद्रभागा नेहारे यांच्या घरचा भवानी माता मंदिरात जेवणाचा कार्यक्रम होता. दुपारी निलेश मंदिरात जेवण करण्यासाठी गेला होता. तेथे जयस्वाल व मानकर या दोघांत पुन्हा वाद झाला. यानंतर तो घरी आला. दरम्यान, रात्री १२.१५ वाजता जयस्वालसह चौघांनी मानकरचे घर गाठले. दार ठोठावले; पण दार न उघडता कुटुंबातील सदस्यांनी भीतीपोटी मागील दाराने पळ काढला. काही वेळ दार न उघडल्याने चौघेही निघून गेले. यामुळे मानकर कुटुंबीय दाराला कुलूप लावून सासुरवाडीला गेले. काही वेळाने पुन्हा चौघेही मानकर यांच्या घरावर गेले. प्रथम घरासमोर उभा असलेला आॅटो, दुचाकीची तोडफोड केली. यानंतर दार तोडून घरातील दोन आलमाऱ्या, टीव्ही, फ्रीज, सोफा, दिवाणची तोडफोड केली. शिवाय कपाटातील ३५ हजार रुपये रोख, सोन्याचा गोप, आंगठी, चैन असा ऐवज घेऊन पळ काढला. यात मानकर कुटुंबीयांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत सकाळी ६ वाजता माहिती मिळताच निलेश व कुटुंबीय घरी पोहोचले असता हा प्रकार दिसून आला. याबाबत कल्याणी निलेश मानकर (२४) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांनी पाहणी केली. या प्रकरणी भादंविच्या कलम ४४९, ४५२, ४५७, ३८०, ४२७, ५०४, ५०६, ३४ तसेच आर्म अ‍ॅक्ट ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात राजेश स्वामीनारायण जयस्वाल व इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील एक आरोपी वृत्त लिहिस्तोवर फरार होता. गळ्याला चाकू लावून फोडला आॅटो निलेश मानकर याच्या घरी विजय देविदास ढोरे हा युवक भाड्याने राहतो. तो आॅटो चालवून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी रात्री घरासमोर आॅटो उभा करून तो झोपला होता. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास चौघे जण तेथे आले. यावेळी विजयच्या गळ्याला चाकू लावून निलेश मानकरबाबत चौकशी केली. यानंतर त्याला झोपण्यास सांगून बाहेर असलेल्या आॅटोची तोडफोड केले. यात युवकाचे दहा हजार रुपयाचे नुकसान केले. आपसी वैमनस्यातून घडलेला हा प्रकार आहे. यात सुमारे ७२ हजार रुपयांचे नुकसान केले असून ७४ हजार ४०० रुपयांचे सोने व रोख लंपास केली आहे. आरोपींच्या शोधार्थ दोन पथके पाठविली आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. - माधव पडिले, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा.