शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर सापडलेले ३ लाख रुपये केले पोलिसांच्या स्वाधीन

By admin | Updated: April 10, 2017 01:28 IST

सर्वत्र पैशाकरिता अराजकता माजली असताना अजुनही कुठेतरी प्रामाणिकता जिवंत आहे, याचा प्रत्यय हिंगणघाटात आला.

हिंगणघाट : सर्वत्र पैशाकरिता अराजकता माजली असताना अजुनही कुठेतरी प्रामाणिकता जिवंत आहे, याचा प्रत्यय हिंगणघाटात आला. येथील रस्त्यावर पडलेली तब्बल ३ लाखांची रोकड दोन युवकांनी थेट पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनीही त्यांच्या या कार्याची दखल घेतली. ठाणेदार साळवी यांनी ठाण्यातच त्यांचा सत्कार केला. प्रामाणिकता कायम असल्याची जाण देणाऱ्या या दोन युवकांची नावे सुमीत सुरेश चन्ने (२६) व महेश नानाजी जाधव (३२) रा. कोचर वॉर्ड अशी आहेत. बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास येथील तहसील कार्यालयासमोर सुमित व महेश हे दोघे दुचकीने जात असताना त्यांना रस्त्यावर एक थैली पडलेली दिसून आली. त्यांनी ती थैली उघडून पाहिली असता त्यात नोटांचे बंडल असल्याचे दिसले. त्यांनी लगेच ती थैली घेवून पोलीस ठाणे गाठले. या थैलीतील राजधानी या कापड दुकानाची देयके होती. ठाणेदार साळवी यांनी त्या देयकावरील भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कापड व्यावसायिक मोटवानी यांना बोलविले. सदर रक्कम त्यांचीच असल्याची शहानिशा केल्यानंतर थैलीतील एकूण ३ लाख ३ हजार ३५० रुपयांची रक्कम मोटवानी यांच्या स्वाधीन केली. मोटवानी यांनीही पोलीस ठाणे गाठत रक्कम स्वीकारत या युवकांचे आभार मानले. ठाणेदार साळवी यांनी या दोन्ही युवकांचा ठाण्यातच शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी जमादार गजानन काळे, समाजसेवी रवींद्र डुंगरवाल, प्रशांत धायवनकर, राहुल देवगीरकर, रमेश कुंभारे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)