शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन जेसीबी मशीनसह तीन बोटी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:34 IST

वर्धा नदीवर हिंगणघाट तालुक्यातील कारेगाव या रेतीघाटावर विनापरवाना रेतीचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलच्या कर्मचाºयांना मिळाली.

ठळक मुद्देकारेगाव रेतीघाटावर तहसीलदारांची धाड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा नदीवर हिंगणघाट तालुक्यातील कारेगाव या रेतीघाटावर विनापरवाना रेतीचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलच्या कर्मचाºयांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी या घाटावर धाड घालून रेतीचा उपसा करण्याकरिता असलेले दोन जेसीबी आणि तीन बोटी जप्त केल्या आहेत. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. या प्रकरणी घाटमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वर्धा जिल्ह्यातील रेतीघाट अनेक अधिकाºयांसह इतरांकरिता आर्थिक व्यवहारांचे साधन बनले आहे. जिल्ह्यातील अनेक रेतीघाटांवर विना परवानगी रेतीचा उपसा करण्यात येत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. याची माहिती महसूल विभागासह पोलिसांना असतानाही त्यांच्याकडून कारवाई करण्यात नाही. असाच प्रकार कुरन येथील रेतीघाटावर होत असल्याची माहिती मिळताच येथे धाड घालण्यात आली. येथे दोन जेसीबी मशील आणि तीन बोटी जप्त करण्यात आल्या. जप्त केलेली साधनसामुग्री तहसील कार्यालयात आणण्यात येत आहे.कारवाई करण्यात आलेल्या या घाटधारकाचे नाव संतोष पनपालिया असे असून मशीन मालक चेतन डहाके व गणेश लाखे हे आहेत. सदर कारवाई जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अपर जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार सचिन यादव व महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या चमूने केली. या मोहिमेत नायब तहसीलदार अजय झिले, मंडळ अधिकारी उके, भोपे व तलाठी चंदनखेडे, कडू, इंगळे व कनिष्ठ लिपिक राजीव बदड, शिपाई अनिल भेदूरकर व वाहन चालक शेख सहभागी होते.महसूल विभागाने एका रेती घाटावर कारवाई केली. असे अनेक रेतीघाट जिल्ह्यात सुरू आहेत. त्या घाटांवर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी देण्याची गरज आहे.