शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

चोरट्यांनी फोडली तीन घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:12 IST

परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी शहरानजीकच्या पिपरी (मेघे) भागातील राममुर्ती वैद्य ले-आऊट येथील दोन घर तर गोपालनगर येथील एका घराला टार्गेट केल्याने परिसरात चोरट्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी वैद्य ले-आऊट भागातील एका घरात व गोपाल नगरातील एका घरात आपले काम फत्ते केले. परंतु, घर मालक बाहेर गावी असल्याने चोरट्यांनी किती मुद्देमाल लंपास केला हे सायंकाळी उशीरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.

ठळक मुद्देपिपरी (मेघे) परिसरात दहशत : रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी शहरानजीकच्या पिपरी (मेघे) भागातील राममुर्ती वैद्य ले-आऊट येथील दोन घर तर गोपालनगर येथील एका घराला टार्गेट केल्याने परिसरात चोरट्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी वैद्य ले-आऊट भागातील एका घरात व गोपाल नगरातील एका घरात आपले काम फत्ते केले. परंतु, घर मालक बाहेर गावी असल्याने चोरट्यांनी किती मुद्देमाल लंपास केला हे सायंकाळी उशीरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.चोरट्यांनी संधी साधून कारला चौक भागातील गोपालनगर येथील देवराव विठ्ठल पारसडे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील आलमारीतील साहित्य अस्ताव्यस्त केले. हा प्रकार लक्षात येताच पारसडे यांचे नातेवाईक विनायक पिसे यांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. तर पिपरी (मेघे) भागातीलच राममुर्ती वैद्य ले-आऊट येथील जनार्दन बरडे यांच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. तर डॉ. डी.सी. कुमेरीया यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला. पारसडे व बरडे हे घटनेच्यावेळी बाहेरगावी गेले असल्याने व ते सोमवारी सायंकापर्यंत वर्धेत परत न आल्याने यांच्या घरातून चोरट्यांनी किती रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला हे स्पष्ट होऊ शकले नाही. वृत्तलिहिस्तोवर तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.महावितरणने पकडले चार वीजचोरवर्धा : विद्युत चोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा धडाका सध्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लावला असून छापा टाकून विद्युत चोरीची चार प्रकरणे महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी उजेडात आणली आहेत. त्यांच्या या धडक कारवाईमुळे विद्युत चोरी करणाºयांचे धाबे दणाणले आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या चमुने वर्धेतील विद्युत चोरीची चार प्रकरणे उजेडात आणली आहे. सदर चोरट्यांकडून १ लाखापेक्षा अधिक देयकाची रक्कम आणि तडजोड शुल्क वसूल करण्यासाठी पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे. यापूर्वी महावितरणच्या अधिकाºयांनी मागील आठवड्यात विद्युत चोरी करणाºया दोघांवर कारवाई केली होती. महावितरणच्या वर्धा विभागीय कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्या नेतृत्वात विद्युत चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी केजाजीनगर, गोंड मोहल्ला, पूलफैल या भागात विद्युत मिटर तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तपासणीदरम्यान तीन विद्युत ग्राहकांनी थेट वायर टाकून विद्युत घेतल्याचे लक्षात आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या चोरट्यांनी ५ हजार १२६ युनिट विद्युत चोरी केल्याचे पुढे आल्याने त्यांना आठ हजार रुपये भरण्याचे व चार हजार रुपये तडजोड शुल्क असे एकूण १२ हजार रुपयांचे देयक देण्यात आले आहे. केजाजीनगरातील दोन ग्राहकांनी १० हजार ९७ युनिटची विद्युत चोरी केल्याने त्यांना तडजोड शुल्कासह एकूण ६४ हजार १८० रुपयांचे देयक देण्यात आले. तर अन्य एका प्रकरणात घरगुती वीज ग्राहकाने व्यवसायिक कारणासाठी विद्युतचा वापर केल्याचे निदर्शनास आल्याने त्याला तडजोड शुल्कासह ४० हजार ५५० रुपयांचे देयक देण्यात आले आहे.