शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

११.८० कोटींतून साकारतेय तीन आरोग्य केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:33 IST

ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली. याद्वारे जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे प्रगतिपथावर आहेत. ११ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीतून हे तीनही आरोग्य केंद्र साकारत आहे.

ठळक मुद्देकामांची पाहणी : गुणवत्ता राखण्याच्या सूचना

आॅनलाईन लोकमतवर्धा : ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली. याद्वारे जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे प्रगतिपथावर आहेत. ११ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीतून हे तीनही आरोग्य केंद्र साकारत आहे.शासनाच्या आरोग्य यंत्रणेमार्फत शासकीय रुग्णसेवा भक्कम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातूनच जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली होती. यासाठी निधीही मंजूर करण्यात आला. यातील वायगाव (नि.) येथे कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र साकारत आहे. यासाठी ४ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तळेगाव (टा.) आरोग्य केंद्रासाठी २ कोटी ६१ लाख रुपये तर पोहणा येथील आरोग्य केंद्रासाठी ४ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे. जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट यांच्या पुढाकाराने ही कामे प्रगतिपथावर आहेत.जि.प. बांधकाम विभागाद्वारे केले जात असलेल्या या बांधकामावर सभापतींचे लक्ष आहे. शिवाय संबंधित अभियंत्यांनाही कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देत दर्जेदार बांधकाम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ५ मार्च रोजी जि.प. सभापती जयश्री गफाट, शाखा अभियंता डोळे, आरोग्य विस्तार अधिकारी राठोड यांनी बांधकामांना भेटी देत पाहणी केली. याप्रसंगी कामे वेळेत पूर्ण करून आरोग्य केंद्र रुग्णांच्या सेवेत रूजू करावे, अशा सूचनाही दिल्या.प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम वेळेत पूर्ण करून ते रुग्णांच्या सेवेत रूजू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कामांची वेळोवेळी पाहणी केली जात असून अभियंत्यांना बांधकामाची गुणवत्ता तपासण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.- जयश्री गफाट, सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, जि.प. वर्धा.