शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम येथे २८ फेब्रुवारीपासून तीन दिवसीय गांधी विज्ञान संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:26 IST

गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, त्यांनी केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांचा व त्यांच्या समकालीन औचित्याचा वेध घेण्याच्या अनुषंगाने जनसहयोग ट्रस्टच्या माध्यमातून गांधी विज्ञान संमेलनाचे २८ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत सेवाग्राम येथील नयी तालीम परिसरात आयोजन करण्यात आले

ठळक मुद्देसोहम पंड्या। मगन संग्रहालयातील पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, त्यांनी केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांचा व त्यांच्या समकालीन औचित्याचा वेध घेण्याच्या अनुषंगाने जनसहयोग ट्रस्टच्या माध्यमातून गांधी विज्ञान संमेलनाचे २८ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत सेवाग्राम येथील नयी तालीम परिसरात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोहम पंड्या यांनी शनिवारी मगनसंग्रहालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी मगन संग्रहालयाच्या डॉ. विभा गुप्ता, गांधी विचार परिषदेचे भरत महोदय, सुनीती सू.र., पुणे येथील मराठी विज्ञान परिषदेचे विनय र. र., ग्रामसेवा मंडळाच्या मालतीताई, नयी तालीमच्या सुषमा शर्मा, गजेंद्र सुरकार आदी उपस्थित होते.तीनदिवसीय या संमेलनाकरिता महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील २०० पेक्षा अधिक प्रतिनिधी एकत्रित येणार आहेत, अशी माहितीही पंड्या यांनी दिली.संमेलनाचे उद्घाटन २८ ला सकाळी १०.३० वाजता वैज्ञानिकता आणि गांधीजी या विषयाने डॉ. अनिल सद्गोपाल करणार आहेत. डॉ. अभय बंग यांचे बीजभाषण होईल. अध्यक्षस्थानी जी. जी. पारिख असणार आहेत. तत्पूवीर १० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. गुप्ता यांच्या हस्ते होईल. दुपारच्या सत्रात रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, सोपान जोशी, अतुल देऊळगावकर, आनंद माझगावकर, प्रदीप शर्मा विषयांची मांडणी करणार आहेत. १ मार्चला अशोक बनग, निरंजना मारू, अजय चांडक, डॉ. सतीश गोगुलवार, सुषमा शर्मा, सोहम पंड्या, करुणा फुटाणे, योगेश कुलकर्णी, श्रीकांत नावरेकर, विजय दिवाण विचार मांडतील. अध्यक्षस्थानी धरामित्रचे डॉ. तारक काटे राहणार आहेत. यानंतर गटचर्चा, एकत्रित चर्चा होणार आहे. २ मार्चला युवा वैज्ञानिकांची मांडणी, उद्याचे प्रश्न व गांधी विज्ञानाच्या संभाव्यता याविषयावर चर्चासत्र होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद वाटवे असतील. गांधी विज्ञानाच्या प्रकाशात, शाश्वत विकासाच्या दिशेने या विषयाची मांडणी मेधा पाटकर करणार असून यानंतर संमेलनाचा समारोप होणार आहे, अशी माहिती डॉ. गुप्ता यांनी दिली. गांधीचा विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्यासाठी नागरिकांसोबतच विद्यार्थ्यानीही संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम