शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्री तीन घरफोड्या

By admin | Updated: November 9, 2016 00:51 IST

शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. सोमवारी एकाच रात्री सिंदी (मेघे) परिसरातील तराळे ले-आऊट येथे तीन घरफोड्या झाल्या.

शहरात घरफोड्यांचे सत्र : नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण वर्धा : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. सोमवारी एकाच रात्री सिंदी (मेघे) परिसरातील तराळे ले-आऊट येथे तीन घरफोड्या झाल्या. यात चोरट्यांनी किती रुपयांचा मुद्देमाल लंपास केला, हे अद्याप उघड झाले नाही. चोरीची माहिती मिळताच पोलिसांकडून नित्याप्रमाणे पंचनामा करून गुन्हे दाखल करण्याची कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. शहरालगत असलेल्या भागात एकाच रात्री घडलेल्या या घरफोड्यांमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी या चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्याची मागणी शहरात जोर धरत आहे. तराळे ले-आऊट येथील दुर्गा मंदिर परिसरातील भारती प्रवीण धोटे यांच्या घरी चोरी झाल्याचे आज सकाळी उघड झाले. धोटे यांच्या घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरावर हात साफ केला. या घरातून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख लंपास केली. या चोरीचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असतानाच याच भागातील रमेश जगताप यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी जगताप यांच्या घराकडे मोर्चा वळविला. येथेही चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत साहित्य लंपास केल्याचे समोर आहे. या प्रकरणात चोरट्यांच्या हाती विशेष ऐवज लागला नसून केवळ सहा हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. या चोरीचा तपास सुरू असताना सायंकाळच्या सुमारास याच भागात तिसरी चोरी झाल्याचे उघड झाले. ही चोरी लोणारे यांच्या घरी झाली असून त्यांनी सायंकाळी रामनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. यामुळे या चोरीत नेमका किती रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला याचा खुलासा झाला नाही. या तीनही चोरीतील चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत एकच असून घरांवर लक्ष ठेवत कुलूपबंद घर हेरून चोरी करणारी टोळी येथे कार्यरत असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.(शहर प्रतिनिधी) गुन्हे नोंदविण्यात आघाडीवर असलेले पोलीस तपासात मात्र मागासचचोऱ्यांचे गुन्हे नोंदविण्यात वर्धा पोलीस आघाडीवर असले तरी चोरट्यांचा छडा लावण्यात मात्र त्यांचा घाम निघत असल्याचे सध्या दिसत आहे. वर्धा शहरातच नव्हे तर जिल्ह्यात चोरट्यांकडून घरातील ऐवज लंपास करण्याच्या घटना रोजच ठाण्यात दाखल होत आहे. एवढेच नव्हे तर घरात शिरून चाकूचा धाक दाखवून महिलेसमक्ष घरातील साहित्य लंपास केल्याची घटना आर्वी येथे नुकतीच घडली. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. असे असताना या चोऱ्यांचा छडा लावण्यात मात्र पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्याचेच दिसून आले आहे. जिल्ह्यात होत असलेल्या चोरी व लुटमारीसह अन्य गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा कार्यरत आहे; मात्र गुन्हे शाखेचे पोलीस केवळ दारू पकडण्यातच कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात पोलिसांवर हावी होत असलेल्या चोरट्यांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांना लक्ष देण्याची गरज आहे.