शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांची शिकार करणारे तिघे अटकेत

By admin | Updated: February 13, 2017 00:40 IST

येथील शांतीनगर परिसरात पाणकोंबड्यांची शिकार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या मदतीने पिपल्स फॉर अ‍ॅनिमलने धाड मारली.

शिकारीचे साहित्य जप्त : सहा जिवंत पाणकोंबड्या सापडल्या वर्धा : येथील शांतीनगर परिसरात पाणकोंबड्यांची शिकार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या मदतीने पिपल्स फॉर अ‍ॅनिमलने धाड मारली. यात तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून शिकारीचे साहित्य आणि सहा जिवंत पाणकोंबड्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली. रामा दगड़ू चव्हाण, माइकल सुरेश भोसले, सूरज सुरेश भोसले तिघेही रा.पुलफैल अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेले तिघेही नेहमीच ससे, घोरपड़ी, बदक व पाणकोंबड्या पकडत असल्याची माहिती वनविभागाने दिली. या तिघांजवळून ससे, जंगली प्राणी व पक्षी पकडण्याकारिता वापरण्यात येत असलेले मोठे जाळे, धारदार शस्त्रे व पिंजरे आदि साहित्य जप्त करण्यात आले. शिवाय त्यांच्याजवळून एका पोत्यातून सहा नग जिवंत पाणकोंबड्या (वाटर हेन) जप्त करण्यात आल्या आहेत. वनविभागाच्या ताब्यात असलेले शिकारी या कोंबड्या बाजारात विक्री करीत असल्याची माहिती आहे. यावर कारवाई करण्याची गरज आहे. वनविभागाने या तिघांवरही वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही वनविभागाचे बिट गार्ड बी.डब्लू. इंगळे, आर. पी. धनविज तसेच पिपल्स फॉर एनिमल्सचे कौस्तुभ गावंडे, लखन येवले, अजिंक्य काळे यांनी केली.(प्रतिनिधी) इतवारात २०० ते ३०० रुपये जोडीने विक्री या शिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या पाणकोंबडीची एक जोडी रविवारी बाजाराचा दिवस असल्याने इतवारा परिसरात २०० ते ३०० रुपयांत विकली जाते. अशा शिकाऱ्याजवळ हे पक्षी पकडण्याकरिता विशेष प्रकारचे पिंजरे व जाळे असताता. असे शिकारी जिल्ह्यात कुठेही दिसून आल्यास नागरिकांनी याची माहिती त्वरित वन विभाग किंवा पीपल फॉर एनिमल्स वर्धा यांना देण्यात यावी, असे कळविण्यात आले आहे.