शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

येळाकेळी येथील तीन गिट्टी खदानींंना ठोकले सील

By admin | Updated: March 15, 2016 03:56 IST

येळाकेळी परिसरात सुरू असलेल्या तीनही गिट्टी खदान मालकांनी परवान्याचे नूतनीकरण न करताच काम सुरू ठेवल्याची

सेलू : येळाकेळी परिसरात सुरू असलेल्या तीनही गिट्टी खदान मालकांनी परवान्याचे नूतनीकरण न करताच काम सुरू ठेवल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. शिवाय या खाण मालकांवर महसूलची थकबाकीही होती. यावरून सोमवारी तहसीलदारांनी चमूसह येथे धाड घातली. त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नसल्याने या तीनही खदानीला सिल ठोकण्याची कारवाई केली. दुर्गासिंह धनवाल, ओमप्रकाश वैरागडे व योगेश कुळकर्णी यांच्या मालकीच्या खदानी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. शिवाय या खदानीबाबत नागरिकांच्या व परिसरातील शाळांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. प्राप्त माहितीनुसार, खदान चालविताना शासनाकडून मिळत असलेल्या परवान्याचे ठाराविक कालावधीनंतर नूतनीकरण करणे गरजेचे आहे. असे असताना या तीनही खदान मालकांनी त्यांची मुदत संपल्यानंतर त्याचे कुठलेही नूतनीकरण न करता उत्खननाचे काम सुरूच ठेवले. याची माहिती सेलू येथील तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांना मिळाली. यावरून त्यांनी आज नायब तहसीलदार अजय झिले, झडशीचे मंडळ अधिकारी डेहणे, तलाठी चौधरी, कनिष्ठ लिपीक तलाठी आगलावे व डोईफोडे यांच्यासह पोलीस शिपाई जावेद यांनी खदानीवर धाड घातली. कागदपत्र तपासले असता खदानीचे नूतनीकरण झाले नसल्याचे दिसून आले. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)एक वर्ष होवूनही परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही. तसेच महसूल थकबाकीबाबत मागणी नोटीस देवूनही थकबाकी जमा केली नाही. त्यामुळे सील लावण्याची कारवाई करण्यात आली. - डॉ. रवींद्र होळी, तहसीलदार सेलू,