शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

आयटीआयमधील चोरीप्रकरणी तिघे अटकेत

By admin | Updated: February 15, 2016 02:11 IST

हनुमान टेकडी परिसरात असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका खोलीतून मोठ्या प्रमाणात साहित्य लंपास झाले होते.

भंगार व्यावसायिकाचा समावेश : ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त वर्धा : हनुमान टेकडी परिसरात असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका खोलीतून मोठ्या प्रमाणात साहित्य लंपास झाले होते. या प्रकरणी तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन महिलांसह साहित्याची खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकालाही अटक केली आहे. अटकेतील चोरट्यांकडून ४८ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मोना सातपुते (२५) व अनिता जाधव (३०) दोन्ही रा. वडार झोपडपट्टी आर्वी नाका या दोघींसह भंगार विक्रेता संजय रमेश बोरे (३६) रा. गौरक्षण वॉर्ड याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २३ जानेवारीपूर्वी गोदामाची खिडकी तोडून अज्ञात चोरट्याने ड्रील मशीन, वेल्डींग रॉड, वजने, प्रेशर रेग्युलेटर आॅक्सीजन, इलेक्ट्रीकल बॉक्स व इतर साहित्य एकूण १ लाख ७ हजार ४२० रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार प्राचार्य देवानंद गायधनी रा. नाचगणाव यांनी पोलिसात दिली. रामनगर पोलिसांनी यावरून भादंविच्या कलम ४५४, ४५८, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयावरून मोना व अनिता या दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी चोरीची कबुली असून त्यांच्याजवळून पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. उर्वरित साहित्य त्यांनी भंगार विक्रेता संजय बोरे याला विकल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेत त्याच्याजवळून इतर साहित्य जप्त केले असून आरोपींना रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, यांच्यासह सहायक उपनिरीक्षक अशोक वाट, बालवाल, दिवाकर परिमल, अमर लाखे, समीर कडवे, आनंद भस्मे, संचाली मुंगुले, शिल्पा राऊत व चालक भुषण पुरी यांनी केली. (प्रतिनिधी)