शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

साक्षीदारांना धमकावून बळजबरीने घेतला अंगठा

By admin | Updated: May 24, 2014 23:51 IST

पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या रसुलाबाद येथील मोतीराम मेश्राम यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. पुलगाव पोलीस ठाण्याचे बिट जमादार वर्धापूरकर

वर्धा : पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या रसुलाबाद येथील मोतीराम मेश्राम यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. पुलगाव पोलीस ठाण्याचे बिट जमादार वर्धापूरकर यांनी साक्षीदारांना धमकावून बळजबरीने अंगठा घेतला. या प्रकरणी फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी रसुलाबाद येथील आकाश मेश्राम याने पोलीस अधीक्षकांना तक्रारीतून केली आहे.

आकाश मोतीराम मेश्राम रा. रसुलाबाद पो.स्टे. पुलगाव याने अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीनुसार त्याचे वडील मोतीराम मेश्राम रा. रसुलाबद यांना गैरअर्जदार राजेराम वासनिक, कमलाबाई वासनिक, भीमराव वासनिक, दिगांबर बांबर्डे, निर्मला बांबर्डे, सोनाली बांबर्डे आदींनी बेदम मारहाण केली. यामुळे त्यांचा २४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. याबाबत पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. यानंतर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली. यावरून आदेशानुसार मातीत पुरलेला मृतदेह उकरून शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हापासून पुलगाव पोलिसांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. सदर प्रकरण दडपण्याच्या उद्देशाने बिट जमादार वर्धापूरकर यांनी २१ मे रोजी साक्षीदार अरुणा उईके यांच्या घरी जावून त्यांना धमकाविले. किचनमध्ये नेऊन त्यांच्या हाताचा निशाणी अंगठा घेतला. तुम्ही काय लिहिले, हे वाचण्याकरिता मी कुणाला तरी बोलविते, असे म्हटल्यावर कुणाला बोलविण्याची गरज नाही, असे म्हणून त्यांनी कागद बॅगमध्ये ठेवला. यावरून वर्धापूरकर यांनी पैशाची देवाण-घेवाण केली असावी व वरिष्ठ अधिकार्‍यांना चुकीची माहिती पुरवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही आकाशने केला आहे. पोलिसांनी प्रकरण दडपणे योग्य नाही. यामुळे अधीक्षकांनी जातीने लक्ष घालून चौकशी करावी व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आकाश मेश्राम व त्याच्या कुटुंबियांनी तक्रारीत केली आहे.(शहर प्रतिनिधी)