शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धाम नदीचे पावित्र्य धोक्यात

By admin | Updated: May 10, 2014 00:28 IST

वर्धा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही प्रसिद्ध असलेल्या पवनार येथील धाम नदी परिसरातील विनोबा भावे यांचा परमधाम आश्रम परिसर ...

पराग मगर - वर्धा

संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही प्रसिद्ध असलेल्या पवनार येथील धाम नदी परिसरातील विनोबा भावे यांचा परमधाम आश्रम परिसर व धाम नदीचे पात्र सध्या मद्यपींच्या विळख्यात सापडले आहेत. येथे पर्यटकांना दारूच्या बाटल्या व घाणीचे दर्शन नित्याचेच झाले आहे. पवनार येथील सुप्रसिद्ध विनोबा आश्रम हा धाम नदीकाठावर वसलेला आहे. हा नदी परिसर काळ्या खडकांनी व्यापला आहे. त्यामधून खळखळत बाराही महिने पाणी वाहात असल्याने पर्यटकांसाठी हे ठिकाण आवडीचे आहे. त्याच प्रकारे नदीच्या दुसर्‍या काठावर मंदिरांनी व्याप्त नंदीखेडा परिसर आहे. काहीच वर्षांपूर्वी या भागाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. पर्यटकांसह दसव्याचा विधी करणार्‍यांचीही नंदीखेडा परिसरात गर्दी असते. वर्षभर जत्रा भरत असल्याचे चित्र आहे. पण चांगले वातावरण व भरपूर एकांत यामुळे हा भाग दारुडे व आंबटशौकिनांचाही अड्डा बनत चालला आहे. नदीवरील समाधी परिसर तसेच नंदीखेडा परिसरात रात्री रंगत असलेल्या दारूच्या पार्ट्या पहाटे फिरायला गेल्यावर पडून दिसत असलेल्या दारूच्या बाटल्या, पाण्याचे पाऊच, टिस्पोजेबल ग्लास, चिप्सचे पॅकेट आदींवरून लक्षात येते. यामध्ये गावठी दारूसह देशी विदेशी दारूचा समावेश असल्याचे बाटल्यांवरून लक्षात येते. फिरण्याच्या निमित्ताने बाहेरून येत असलेल्यांचाही यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याकडे लक्ष देत येथील असा प्रकार बंद करावा अशी मागणी वारंवार ग्रामस्थ व पर्यटक करीत असतात. यावरून काही काळ याकडे लक्ष स्थानिक प्रशासन थातुर मातुर कारवाई कारते. पण काही कावधी जाताच पुन्हा हा प्रकार सुरू होतो. या परिसरात महिला वर्गही सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी तसेच नंदीखेडा परिसरात दर्शनासाठी येत असतात. पण मद्यपिंच्या हैदोसामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. अनेकदा दारूच्या बाटल्या फुटल्याने पायाला ईजाही होतात. प्लास्टिकचे ग्लास, पाईच हवेने उडत नदीपात्रात पसरत असल्याने दुर्गंधी सुटली आहे. नंदीखेडा मंदिर परिसरात मागच्या बाजुला बाटल्या, पाणी पाऊच आणि ग्लासेसचा खच नेहमीच असतो.