शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 22:28 IST

सेलू तालुक्यात विकासाचा झंझावात सुरु असताना पंचायत समितीती पशू संवर्धन विभागाच्या कार्यालयाकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेलेले नाही. या कार्यालयातील छत केव्हा कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पडेल, याचा नेम नसल्याने कर्मचारी जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावत आहे.

ठळक मुद्देछत डोक्यावर कोसळण्याची भीती : दुरुस्तीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सेलू तालुक्यात विकासाचा झंझावात सुरु असताना पंचायत समितीती पशू संवर्धन विभागाच्या कार्यालयाकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेलेले नाही. या कार्यालयातील छत केव्हा कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पडेल, याचा नेम नसल्याने कर्मचारी जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावत आहे.तालुक्यातील पशुंना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी, याकरिता झडशी, सालई, सुकळी, घोराड आदी ठिकाणी सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या. पण, पडझड झालेल्या सेलू पंचायत समितीच्या आवारात असलेल्या पशू संवर्धन कार्यालयाचे रुपडे पालटविण्याकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेले नाही. या इमारतीच्या छतावरील कवेलू अस्ताव्यस्त असल्याने पावसाळ्यात छत गळतात. त्यामुळे इमारतीचे हे छत खिळखिळे झाले आहे. ते छत कधी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पडेल याचा नेम राहिला नाही. अनेकदा येथील छताचा काही भाग हा टेबल व खुर्च्यावर पडलेला दिसून येतो. एखाद्यावेळी मोठा वारा सुटला की, इमारतीचे छत हलू लागते. त्यामुळे ते पडेल की काय? अशा भीतीतच कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. सध्या या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यातही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच स्थिती पंचायत समितीतील इतरही विभागातील असल्याने कर्मचाºयांच्या जीवाची पर्वा नसल्याचेच चित्र पहावयास मिळत आहे. खिळखिळ्या इमारतीतून चालणारा कारभार पाहता नवीन इमारत ही दिवास्वप्नच ठरत आहेत. पण, या कार्यालयाची तत्काळ दुरुस्ती केली नाही तर कर्मचाºयांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच महत्वाचे दस्ताऐवज व साहित्यही असुरक्षित झाले आहे.दोन वर्षांपासून तुटलेल्या छताखाली चालतो कारभारपशू सवर्धन विभागाच्या कार्यालयात ज्या खोलीतून पशुधन अधिकारी विभागाचा कारभार चालवतात. त्याच खोलीतील छत मागील दोन वर्षापासून तुटलेले आहे. मात्र, अद्यापही दुरुस्ती केली नसल्याने छत पडल्यावरच दुरुस्ती केली जाईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पंचायत समितीमध्ये मागील सात वर्षापासून भाजपची सत्ता आहे. एकीकडे विकासाचा गवगवा केल्या जातो. परंतू ज्या कार्यालयातूनच कामकाज चालते ते शासकीय कार्यालय खिळखिळे असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या कार्यालयाला अच्छे दिनची प्रतीक्षा आहे.