शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराच्या चौकशीमुळेच कर्मचाºयांची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:52 IST

११ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत विविध विभागातील बदल्या करण्याचा ठराव पारित करण्यात आला.

ठळक मुद्देआर्वी नगराध्यक्षांचा दावा : पदाधिकाºयांचीही पोलिसांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ११ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत विविध विभागातील बदल्या करण्याचा ठराव पारित करण्यात आला. याचा राग म्हणून बुधवारी सकाळी ११ वाजता मुख्याधिकाºयांनी सुचविल्या प्रमाणे भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. ती चौकशी पूर्ण होवू नये म्हणून न.प. कर्मचारी संजय अंभोरे व महेंद्र शिंगाणे यांनी सदस्यांना व महिला उपमुख्यधिकाºयांना जिवे मारण्याची धमकी दिली, अशी माहिती आर्वीचे नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिली आहे.आर्वी नगर पालिकेत भाजपला सत्ता मिळाल्यानंतर दोन महिणे नगर पालिकाअंतर्गत शहरातील साफ सफाईची कामे सुरळीत सुरू होती. परंतु कामचुकार, भ्रष्ट कर्मचाºयावर पदाधिकाºयाची पकड मजबूत होत आहे. हे लक्षात आल्यावर कर्मचाºयांकडून कामात असहकार करण्याची व कमी काम करण्याची भूमिका घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून आर्वी शहरातील अनेक वॉर्डात नागरिकांच्या घरासमोरील नाल्यांची सफाई न होणे व रस्त्याची साफ-सफाई न झाल्याने नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. यावर बारकाईने लक्ष दिले असता कर्मचाºयांकडून जाणून बुजुन हा प्रकार होत असल्याचे लक्षात आले.कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष, सभापती व नगरसेवक यांनी केला. बुधवारी शिपाई संजय अंभोरे व जमादार महेंद्र शिंगाणे यांनी सदस्य व महिला उपमुख्याधिकारी यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुख्याधिकारी यांना फोन करून माहिती देण्यात आली. ते या संदर्भात निर्णय घेणार होते. ती कारवाई पूर्ण होण्याच्यापूर्वीच सफाई कामगार संघटनेच्या दोनही पदाधिकारी यांनी नगरसेवक कैलास गळहाट व अन्य एकासोबत मारपीट केली.उपविभागीय अधिकारी आर्वी व आर्वी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. त्यात २५ नगरसेवकांच्या स्वाक्षºया आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे नगर पालिका कर्मचारी संघटनेकडून आरोग्य सभापती यांनी संजय अंभोरे यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती आहे.