शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

त्या दुकानदारांना न्यायालयाकडून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:10 IST

स्थानिक हॉलिडे रिसोर्ट परिसरातील ४१ दुकानांना उच्च न्यायालयाच्या आदेशावरून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी सील ठोकले. याच्या विरोधात या व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेत दुकानातील अत्यावश्यक साहित्य मिळावे यासाठी विनंती अर्ज दाखल केला.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात दुकानाबाहेर काढले अत्यावश्यक साहित्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक हॉलिडे रिसोर्ट परिसरातील ४१ दुकानांना उच्च न्यायालयाच्या आदेशावरून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी सील ठोकले. याच्या विरोधात या व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेत दुकानातील अत्यावश्यक साहित्य मिळावे यासाठी विनंती अर्ज दाखल केला. त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार होत सदर साहित्य दुकानाबाहेर काढून घेण्यासाठी न्यायालयाने दुकांदारांना शुक्रवारी वेळ दिला होता. न्यायालयाच्या याच आदेशावरून आज पोलीस बंदोबस्तात आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा अधिकाऱ्यांच्या उपस्थिती दुकानांमधील साहित्य बाहेर काढण्यात आले.स्थानिक बजाज चौक भागातील एमटीडीसीच्या ७ हजार ६५५ चौ.फू. जागेवर व्यावसायिक संकुल तयार करण्यात आले आहे. तेथील दुकाने भाडेत्त्वावर काही व्यावसायिकांना देण्यात आले. तेथील दुकानदार आणि एमटीडीसी यांच्यातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्या ४१ दुकानांच्या विरोधात निकाल दिला. त्या अनुषंगाने २४ जानेवारीला दुकानांना एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी सील लावले होते. या कारवाईमुळे दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर दुकानदार पुन्हा एकदा न्यायालयात गेले. त्यावर २९ जानेवारीला न्यायालयाने दुकानदारांना दुकानातील अत्यावश्यक साहित्य नेण्यासाठी शुक्रवारचा वेळ दिला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकानदारांनी आपआपल्या दुकानातील अत्यावश्यक साहित्य एमटीडीसी व पोलिसांच्या समक्ष मोठ्या शांततेत बाहेर काढले.११ फेब्रुवारीला फेरसुनावणीया प्रकरणावर ११ फेब्रुवारीला फेरसुनावणी होणार आहे. यामध्ये उच्च न्यायालय कुणाच्या बाजूने निर्णय देते याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.आम्ही गुरूवारी न्यायालयाच्या आदेशावरून सील लावण्याची कार्यवाही केली. त्यानंतर या कार्यवाहीच्या विरोधात दुकानदारांनी न्यायालयात धाव घेत हमीपत्र सादर करून दुकानातील अत्यावश्यक साहित्य मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यावर न्यायालयानेही सहानुभूतीपूर्वक विचार केला. न्यायालयाच्या आदेशानुसार आज दुकानांचे सील उघडून त्यांना आवश्यक साहित्य नेण्याची अनुमती देण्यात आली होती. आजची कार्यवाही न्यायालयाच्या आदेशावरून झाली.- प्रशांत सवाई, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी.

टॅग्स :tourismपर्यटन