शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शेतकऱ्यांना मिळाले विहिरीचे अनुदान

By admin | Updated: March 26, 2017 01:05 IST

ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाल्याने सेलूच्या तीन शेतकऱ्यांचे सिंचन विहिरींचे अनुदान मिळण्यास अडचण आली होती.

लोकमतचा पाठपुरावा : शेतकऱ्यांनी मागितली होती आत्महत्येची परवानगीघोराड : ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाल्याने सेलूच्या तीन शेतकऱ्यांचे सिंचन विहिरींचे अनुदान मिळण्यास अडचण आली होती. अखेर दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अकुशल कामाचे अनुदान बँकेच्या खात्यात जमा झाले. यामुळे पूर्ण रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शेतकऱ्यांची व्यथा ‘लोकमत’ने मांडली होती. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तत्कालीन सेलू ग्रामपंचपायतने विहीर खोदकाम व बांधकाम करण्याचे प्रशासकीय आदेश दिले होते. यात सेलू येथील कुंदा प्रभाकर चोरे, विनोद गोमासे, सुरेश कुकडे यांचा समावेश होता. त्यांनी विहिरीच्या बांधकामाला सुरूवात केली व पहिले मष्टर निघण्यापूर्वी १३ मार्च २०१५ रोजी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. येथेच सिंचन विहिरीची देयके अडकली. या तीन शेतकऱ्यांनी अधिकारी, लोकप्रतिनिधी व शासकीय कार्यालयाचे उंबरठे अनुदानासाठी झिजविले; पण पदरी निराशा येत होती. अखेर पंतप्रधानांना आत्महत्या करण्यासाठी परवानगी मागितली होती. याबाबत वृत्त ‘लोकमत’ १० जानेवारी २०१६ रोजी प्रकाशित केले होते. यानंतर १५ आगस्ट २०१६ ला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत कार्यालयासमोर आत्महत्या करणार, असे नमूद केले होते. त्यावेळी २ आगस्ट २०१६ ला आपल्या पत्राची दखल घेत असल्याचे कार्यालयीन अधिकाऱ्यांनी कळविले. परिणामी, शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. यानंतरही त्या तीनही शेतकऱ्यांनी पत्राची देवाणघेवाण सुरूच ठेवली. दरम्यान, शासनाने दखल घेतली असून २४ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अकुशल कामाचे १ लाख ३ हजार ६१५ रुपये प्रत्येकी जमा केले आहेत. यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतल्याने कुशल कामाचे उर्वरित प्रत्येकी १, लाख ७० हजार ९५ रुपये आता कधी मिळतील, याकडे लक्ष लागले आहे. २ लाख ७३ हजार ७१० रुपयांच्या वैयक्तिक सिंचन विहीर योजनेतील अकुशल कामावरील खर्चाची रक्कम मिळाली असली तरी उर्वरित रकमेसाठी शेतकऱ्यांना किती काळ प्रतीक्षा करावी लागेल, हे आता शासनावरच अवलंबून आहे.(वार्ताहर) दोन वर्षांनंतर मिळाले अर्धेच अनुदानसेलू ग्रामपंचायतने २६ फेब्रुवारी २०१४ रोजी या तीन शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीला प्रशासकीय मान्यता दिली तर २ फेबु्रवारी २०१५ रोजी प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. विहिरीच्या खोदकामाला सुरुवात केली आणि १३ मार्च २०१५ ला ग्रा.पं. चे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण होत असताना मस्टर टाकण्याची अडचण निर्माण झाली आणि अनुदान अडकले. दोन वर्षे शेतकरी शासकीय कार्यालयात तगादा लावल्यानंतर शासनाने दखल घेतली; पण अर्धेच अनुदान प्राप्त झाले आहे. ‘लोकमत’चा पाठपुरावाआम्हा शेतकऱ्यांची व्यथा ‘लोकमत’ वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. याची दखलही शासनाकडून घेण्यात आली. ‘लोकमत’मुळे आम्हाला यश आले, असे मत विनोद गोमासे, सुरेश कुकडे व कुंदा चोरे यांनी व्यक्त केले.आता शेतकऱ्यांना आशाविहिरीच्या खोदकाम व बांधकामाला लागलेला खर्च शासन देईलच, अशी आशा या तीनही शेतकऱ्यांना आहे. उर्वरित रकमेचे अनुदान शासनाने लवकर देऊन शेतकऱ्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीला आधार द्यावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.