शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पाच जणांचे सदस्यत्त्व कायम

By admin | Updated: July 11, 2017 00:57 IST

पंचायत समितीमध्ये सभापती आणि उपसभापती निवडीप्रसंगी भाजपच्या पाच सदस्यांनी विरोधी गटातील उमेदवाराला मतदान केले होते.

वर्धा पंचायत समिती येथील प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांचा याचिकेवरील निर्वाळालोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंचायत समितीमध्ये सभापती आणि उपसभापती निवडीप्रसंगी भाजपच्या पाच सदस्यांनी विरोधी गटातील उमेदवाराला मतदान केले होते. यामुळे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पाचही सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिकेतून केली होती; पण पक्षाचा व्हीप बजावल्याचा पुरावा सादर न करता आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाचही सदस्यांचे सदस्यत्त्व कायम ठेवले. या निर्णयामुळे चंदा सराम, ज्योती टिपले, दूर्गा ताजने, सुनीता मेघे, मुते यांचे सदस्यत्त्व कायम आहे.वर्धा पंचायत समितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली होती. त्यावेळी भाजपचा सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपसभापती पद देण्यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये एकमत झाले होते. त्यानुसार भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी स्थापन करीत गटनेता म्हणून महेश आगे यांची निवड करण्यात आली होती. सभापती म्हणून भाजपच्या महानंदा ताकसांडे यांची निवड झाली; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप किटे यांना भाजपच्या पाच सदस्यांनी त्यावेळी मतदान केले नाही. यामुळे काँग्रेस समर्थीत अपक्ष उमेदवार सुभाष चांभारे यांची उपसभापतिपदावर निवड झाली. पंचायत समितीचे गटनेता महेश आगे यांनी याबाबत संबंधित उमेदवारांनी पक्षाचा व्हीप झुगारल्याने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिकेतून केली. याचिकेची सुनावणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकला. त्यावेळी हा व्हीप मिळालाच नसल्याचा मुद्दा पाच सदस्यांनी मांडला. व्हीप न मिळाल्याने पक्षाच्या विरोधात काम केल्याचे म्हणू शकत नाही. याबाबत याचिकाकर्त्यांकडून कागदोपत्री पुरावा सादर न करता आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याचिका फेटाळत सदस्यत्त्व रद्द करण्यास नकार दिला. पाच सदस्यांकडून अ‍ॅड. वैभव वैद्य यांनी युक्तीवाद केला.